देशातील पहिला पोटॅश खत निर्मिती करणारा पांडुरंग कारखाना ठरला

डॉ. यशवंत कुलकर्णी – स्पेंटवॉश पासून पोटॅश निर्मितीमुळे पांडुरंग कारखाना प्रदूषणमुक्त

श्रीपुर (बारामती झटका)

देशातील सहकारी साखर उद्योगामध्ये पांडुरंग कारखान्याने बायलरमधुन निघणा-या गरम वाफेवर स्पिन फ्लॅश ड्रायर हा आधुनिक प्रकल्प उभारुन स्पेंटवॉश पासून पोटॅशयुक्त खताची निर्मिती करणारा पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशातील पहिला कारखाना ठरला आहे. जमिनीचा कस वाढविणे, शेतकऱ्यांचे हित तसेच प्रदूषणमुक्त कारखाना अशी त्रिसूत्री यातून साधली जाणार आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

दिवसेंदिवस रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होत असल्याने जमीनीची सुपीकता कमी होत आहे. त्याला पर्याय म्हणून शेतक-यांना सेंद्रीय खतांचा वापर करण्यासाठी सुपंत पोटॅश निर्मिती कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे.

माळशिरस तालूक्यातील श्रीपुर येथील श्री पाडुरंग सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार झिरो लिक्विड डिस्चार्ज करण्यासाठी रॉ स्पेंटवॉश वरती चालणारा स्पिन फ्लॅश ड्रायर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यामध्ये ९० लाख क्षमता असलेल्या डिस्टलरीज मधून निघणाऱ्या स्पेंटवॉशला ड्रायर केले जाते. त्या स्पेंटवॉश मध्ये चुना सल्फ्युरिक ऍसिड, अमोनिया व बॉयलरची राख योग्य प्रमाणात मिश्रण करून स्पिन फ्लॅश ड्रायर मधे प्रोसेस केले जाते. यामध्ये ४ ते ५ % इतकी पोटॅशची मात्रा आढळून आली असुन, त्याची विक्री पोटॅशयुक्त खत म्हणून शेतक-यांना करीत आहोत.हा प्रकल्प बॉयलरमधुन निघणा-या हॉट फ्लु गॅसेसवरती चालत असल्याने अतिरीक्त स्टीम किंवा बगॅसची आवश्यकता नाही. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होते.

पांडुरंग ने साखर निर्मिती बरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रकल्पाची उभारणी – पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी गेले आठ वर्षात साखर उद्योगा बरोबर पोटॅश खत निर्मिती,कंपोस्ट खत, सॅनिटायझर, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, सौरऊर्जा, सीपीओ टेक्नॉलॉजी मधून पाणी शुद्धीकरण, रेन हार्वेस्टिंग, सुपंत द्रवरूप जिवाणू खते प्रकल्प, माती परीक्षण, सुपंत ऍग्रो फार्म मार्फत ऊस बेनी मळा, ऊस पिक दिनदर्शिका, शेतकरी प्रशिक्षण असे १२ पेक्षा जास्त प्रकल्प उभा करून उत्तम व्यवस्थापन केले आहे.

देशाच्या गरजेच्या ९८ टक्के पोटॅश बाहेर देशातून आयात करावी लागते. भारतात दोन टक्के पोटॅश निर्मिती होते. पांडुरंग कारखाने शेतकऱ्यांना पोटॅशियुक्त खते उपलब्ध व्हावे म्हणून १० कोटी रुपये गुंतवणूक करून सुपंत पोटॅश निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. – डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथे संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत
Next article७२ कोटींच्या वेळापूर पाणी पुरवठा योजनेस तत्त्वतः मंजूरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here