दोन सिंहांचा रुद्राभिषेक एकत्र पाहण्याकरता शंभू महादेव तिसरा डोळा उघडणार का ?

माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा सपत्नीक शुभहस्ते रुद्राभिषेक संपन्न होणार आहे.

वेळापूर ( बारामती झटका )

भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील एकाच पक्षाचे असून दोन वेगवेगळे राजकीय प्रवाह वेगळे वाहत आहेत. मतदार संघात श्रेयवाद सुरू आहे. अशातच शंभू महादेवास रुद्राभिषेक दोन सिंहांच्या शुभहस्ते होणार आहे. अनेक दिवसांनी दोन सिंह एकत्र रुद्राभिषेक करण्याकरता आलेले पाहण्याकरता शंभू महादेव तिसरा डोळा उघडणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे.

वेळापूर ता. माळशिरस येथील श्री महादेव देवालय ट्रस्ट वेळापूर यांचेवतीने अर्धनारी नटेश्वर मंदिरामधील शंभू महादेवास माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील या उभय सपत्नीक लक्ष बिलवार्चंन सोहळा आयोजित केलेला आहे. शनिवार दि. 18/02/2023 रोजी पहाटे 05 ते 09 वाजेपर्यंत शंभू महादेवास रुद्राभिषेक व सायंकाळी 06 वाजता महा सत्संग श्री महादेव देवालय ट्रस्ट अध्यक्ष अमृतराज सूर्यकांत माने देशमुख आयोजित समस्त शिवभक्त व ग्रामस्थ यांनी आयोजित केलेला आहे.

कार्यक्रम धार्मिक आहे परंतु, राजकीय नेत्यांच्या कलगीतुऱ्यामुळे माढा मतदारसंघात पहाटेच्या महारुद्राभिषेकामुळे नवीन राजकीय पहाटेला सुरुवात होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आजपासून अचानक रजेवर ? तालुक्यात उलटसुलट चर्चा..
Next articleआता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे – महेश चिवटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here