धक्कादायक प्रकार : जळभावीचे सरपंच यांची बनावट सही करून विकास कामांचे प्रस्ताव दाखल.

खोटी सही करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा व ग्रामसेवक पी.बी काळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी – सरपंच किसन रामा राऊत.

माळशिरस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बुगड, यांच्यामुळे झाले उघड.


माळशिरस ( बारामती झटका )

जळभावी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे सरपंच किसन रामा राऊत यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन 2021 – 22 या सालातील विकास कामे करण्याचे प्रस्ताव माळशिरस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बुगड ज्यांच्याकडे दलित वस्ती काम पाहण्याचे कामकाज आहे, त्यांच्याकडे गेल्यानंतर जळभावीचे किती प्रस्ताव देता असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरपंच यांना प्रश्न पडला की, अजून कोणत्याच प्रस्तावावर मी सही केली नाही. मग पंचायत समितीत खोटी सही करून प्रस्ताव दाखल झालेला धक्कादायक प्रकार समोर आला‌‌ त्यांनी प्रस्तावावरील सही पाहिल्यानंतर सदरची सही बनावट असल्याने यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दिलेली आहे‌ खोटी सही करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ग्रामसेवक पी.बी. काळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगून माळशिरस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बुगड यांच्यामुळे बनावट सही झाली. अजून असे किती गैरप्रकार झालेली आहेत हे पाहावे लागणार असल्याचे सांगितले.


जळभावी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच यांनी पंचायत समितीकडून बनावट सही केलेल्या कागदपत्राची पाहणी केल्यानंतर सदरच्या दोन्ही प्रस्तावावर ग्रामसेवक पी.बी. काळे यांची सही आहे. यावरून ग्रामसेवक यांना बनावट सही करणारी व्यक्ती व त्यांना सहकार्य करणारे अजून कोणी असणारे याची सर्व माहिती असणार आहे. कारण सरपंचांनी सही केल्यानंतर कोणत्याही कागदपत्रावर ग्रामसेवक सही करत असतात. ग्रामपंचायतमध्ये मिटिंग झाल्यानंतर प्रोसिडिंगवर माझी सही नाही‌. तोपर्यंत ग्रामसेवक व माझी बनावट सही करून प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल कसे झाले असा सवाल उपस्थित होत आहे.


सदरच्या प्रस्तावावर पंचशील नगर येथे 2007-08 पाणीपुरवठा योजना 2.5 लाख व रस्ता डांबरीकरण 2.53 लाख सन 2018 -19 काँक्रीट रस्ता 3.00 लाख सण 2021- 22 हायमास्ट दिवा 1.35 लाख दुसरा प्रस्ताव होलार समाज वस्ती या ठिकाणी सन 2015 – 16 रस्ता डांबरीकरण 2.00.000 हायमास्ट दिवा 2.00.000 सन 2019 – 20 पाणीपुरवठा टाकी करणे, 2.00.000 सन 2021- 22 पेविंग ब्लॉक रस्ता करणे, 3.00.000 हायमास्ट दिवा 1.35.000 अशी विकास कामे पूर्ण झालेली आहेत. सदरच्या प्रस्तावावर बनावट सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. हमीपत्रावर बनावट सरपंच ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. होलार समाज यांच्या प्रस्तावावर सूचक आबासाहेब सुळ तर अनुमोदक आशाबाई राऊत यांची नावे आहेत. सदरच्या ठरावावर बनावट सरपंच ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरचे काम मंजूर करण्यासाठी शिफारस बनावट सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता, विस्ताराधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काम पूर्ण झालेल्या ठिकाणचा पंचनामा केल्यानंतर सदर पंचनामेवर बनावट सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता विस्ताराधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. स्थळदर्शक नकाशावर बनावट सरपंच, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी, उप अभियंता यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

पंचशील नगर व होलार समाज वस्ती प्रस्तावाची छाननी केली असता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत वरील शासन निर्णयप्रमाणे प्रस्ताव पात्र आहे व त्याची मंजुरी प्रस्ताव शिफारस करीत आहे, अशी शिफारस गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती यांची स्वाक्षरी आहे.

वरील माहिती ग्रामपंचायती कडील दप्तरावरुन व प्रत्यक्ष पहिल्या वरून देण्यात आलेली असून सदरची माहिती खोटी आढळल्यास संपूर्ण अनुदान व्याजासह वसूल होईल याची आम्हाला जाणीव आहे असे प्रस्तावावर बनावट सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदरचे प्रस्ताव सरपंच यांच्या स्वाक्षरीने गेलेले नाहीत. सदरच्या प्रस्तावावर ग्रामसेवक यांची व पंचायत समितीच्या शाखाधिकारी, उप अभियंता, विस्ताराधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरची कामे पूर्ण असा शेरा मारलेला आहे. सध्यातरी किसन रामा राऊत यांची स्वाक्षरी नसल्याने सदरची कामे खरी केलेली आहेत का ? नाही ? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कागदोपत्री तरी पूर्ण असा शेरा आहे. लवकरच सर्व प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जळभावी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच किसना रामा राऊत यांनी दिलेला आहे.
माळशिरस पंचायत समितीमध्ये 14 वा व 15 वा वित्त आयोग, विविध योजनेतून रस्ते, गटारी, जलसंधारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये शंका कुशंका असतील त्यांनी कागदपत्रासह बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी मोबाईल नंबर 98 50 10 49 14 या नंबरवर संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका सरचिटणीसपदी सुरज मस्के यांची निवड
Next articleसुखाचे व्यवहार केल्याने मागेपुढे आनंद कोंदला जातो – ह.भ.प. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here