धक्कादायक प्रकार : पिलीवच्या महालक्ष्मीकडे निकृष्ट रस्त्याचे काम पाहून भक्ताच्या अंगात देवी संचारली..

महालक्ष्मीच्या नावानं चांगभलंssss, आई लक्ष्मी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी दे आणि रस्ता चांगला करून घे, बाकी सगळं खुशाल आहे, अशी आरोळी निकृष्ट रस्त्यावर भक्ताने ठोकली.

पिलीव ( बारामती झटका )

पिलीव ता. माळशिरस येथील पंढरपूर-सातारा रस्त्यावरून पिलीवच्या सुप्रसिद्ध व पावन महालक्ष्मीकडे जाणाऱ्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. निकृष्ट रस्त्याचे काम सुरू असल्याने महालक्ष्मी भक्ताच्या अंगात संचारली. महालक्ष्मीच्या नावानं चांगभलं, आई लक्ष्मी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी दे आणि रस्ता चांगला करून घे, बाकी सगळं खुशाल आहे, आनंदी आनंद आहे, अशी निकृष्ट रस्त्यावर भक्ताने महालक्ष्मीला आरोळी देऊन भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्या कानापर्यंत जाण्याकरता भक्ताची आर्त हात होती.

महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मीच्या पवित्र ठिकाणापैकी माळशिरस तालुक्यातील पिलीव गावची महालक्ष्मी सुपरिचित आहे. या देवीची यात्रा माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरत असते. अशा पावनदेवीला बारमाही लोक नैवेद्य घेवून नवस पूर्ण करण्याकरता येत असतात. अशावेळी रस्त्याची गरज असते म्हणून शासनाने सदर ठिकाणी रस्ता जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत केला जात आहे. सदरचा रस्ता सुरू आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर खराब होते, हे आपण पाहतो, ऐकतो. मात्र, रस्ता सुरू असताना निकृष्ट रस्त्याचे काम पाहून भाविक भक्ताच्या अंगामध्ये देवी संचारली. इथपर्यंतचा रस्ता निकृष्ट केलेला आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांनी या गोष्टीकडे आर्थिक हितसंबंधामुळे डोळेझाक केलेली आहे. ठेकेदारांना रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे देणेघेणे नसते. कसातरी घोडीला घोडा लावून मोकळा होणारा ठेकेदार यालासुद्धा जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. अशा ठेकेदाराला काळया यादीत टाकून निकृष्ट काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी देवीच्या भक्तांवर अंगात देवीचा संचार करून म्हणण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleEnrollment: The ECE certificate is offered 100 % online, 2,433.
Next articleशेतकर्‍यांची वीज तोडणे पवार ठाकरे सरकारने केलेला विश्वासघात – के. के. पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here