धक्कादायक प्रकार : शेतकऱ्याच्या पिक कर्ज मागणी अर्जावर अधिकारी व कर्मचारी यांनी परस्पर कर्ज काढले.

बँक ऑफ महाराष्ट्र श्रीपुर शाखेतील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार काढण्यासाठी रिझर्व बँकेने लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांची मागणी.

अकलूज ( बारामती झटका )

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीपुर (बोरगाव) ता. माळशिरस या बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मागणी अर्जावर अधिकारी व कर्मचारी यांनी परस्पर कर्ज काढण्याचा धक्कादायक प्रकार केलेला आहे. शेतकरी कर्जदार व जमीनदार यांना आपले विरुद्ध दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, अशी ॲड. जी. व्ही. गमे यांची नोटीस आल्यानंतर बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांचा अनागोंदी कारभार समोर आलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कर्ज खात्यातील व्यवहार व भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी रिझर्व बँकेने लक्ष देण्याची गरज असल्याचे पीडित शेतकऱ्यांची मागणी आहे.

श्री. रामचंद्र लक्ष्‍मण शिंदे रा. मळोली, ता. माळशिरस यांनी श्री. चांगदेव भागवत जाधव रा. मळोली व श्री. महादेव दगडू निंबाळकर रा. माळखांबी यांना जामीनदार घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र श्रीपुर बँकेकडे कर्ज मागणीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केलेला होता. बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून कर्ज देण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी दुसरीकडून पैशाची तजवीज करून आपली गरज भागवली. मात्र, बँकेत दिलेली सर्व कागदपत्रे तशीच राहिलेली होती. याचा दुरुपयोग अधिकारी व कर्मचारी यांनी करून घेतला आहे.

कर्ज खाते नंबर 60266002134 वर दि. 03/12/2016 रोजी रक्कम रुपये 4 लाख 52 हजार ( 4,52,000 ) रुपये द. सा. द. शेकडा 7 टक्के दराप्रमाणे कर्ज मंजूर करून शेतकरी व जमीनदार कर्जरोखे यावर बनावट सह्या करून परस्पर कर्ज काढले. बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी पिक कर्ज काढल्यानंतर सहा महिन्यांनी त्याच कर्जदाराच्या व जमीनदाराच्या नावे सूक्ष्म सिंचन कर्ज काढले. कर्ज खाते नंबर 60277153828 या क्रमांकावर दि. 17/03/2017 रोजी 3 लाख 15 हजार ( 3,15,000 /-) रुपये द.सा.द.से 10.75 टक्के दराने कर्ज प्रकरण मंजूर करून जुन्याच कागदपत्रावर सूक्ष्म सिंचन कर्ज काढले.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीपुर येथील शाखा अधिकारी श्री. संदीप सोमा साबळे यांनी दिलेल्या माहितीवरून ॲड. श्री. जी. व्ही. गमे यांच्या नोटिसमुळे सदर बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार समोर आले आहे. पीडित शेतकरी रामचंद्र लक्ष्‍मण शिंदे रिझर्व बँकेकडे व पोलीस स्टेशन येथे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. शेतकरी संघटनांचा आधार घेऊन आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून बनावट सह्या करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसकरांना कोणत्याही संकटात आठवतोय “राम”, मात्र रावण प्रवृत्तीची होतेय घालमेल
Next articleवेळापूर विकास सेवा सोसायटीच्या मतदारांपर्यंत शिट्टीचा आवाज घुमला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here