माळशिरस तालुक्यात नेत्यांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्याची सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला सायपण जोडून स्वत:च्या शेतात पाणीपुरवठा सुरू.
माळशिरस ( बारामती झटका )
ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या लोकांची पाण्याची अडचण होऊ नये यासाठी शासन सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना राबवित असतात. जेणेकरून वाडीवस्तीवर व गावाला पिण्याच्या पाण्याचा फायदा व्हावा, यासाठी योजना राबवली जाते. मात्र, माळशिरस तालुक्यात सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना गावाची फायदा मात्र, नेत्याच्या बगल बच्चांचा असा धक्कादायक प्रकार माळशिरस तालुक्यातील नेत्यांच्या आशीर्वादाने घडला आहे. सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला सायपण जोडून स्वतःच्या शेतात पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

गावातील व वाड्या-वस्त्यावरील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्याकरता कोट्यावधी रुपये खर्च करून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून अंमलात आणलेली आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला सायपण जोडून विहिरीमध्ये पाणी सोडलेले आहे.
घराजवळ चेंबर काढलेला आहे. सदरची योजना राबवित असताना जनतेचे हित बाजूला राहून कार्यकर्त्याच्या हिताकडे ज्यादा लक्ष दिलेले आहे. गावाची नळ पाणी पुरवठा मात्र, फायदा नेत्याच्या बगल बच्चाला अशी अवस्था आहे. सदरची योजना कधी मंजूर झाली, किती कोटीची आहे, ठेकेदार कोण, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण माहिती घेऊन खरा प्रकार जनतेसमोर मांडला जाईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
