धक्कादायक बातमी – पालखी महामार्गातील भूसंपादन व निवाडा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार.

अव्वल कारकून अजित जाधव, कंत्राटी संगणक ऑपरेटर पल्लवी शिंदे यांच्यासह खाजगी एजंट घाडगे, बनकर, भगत यांची खातेनिहाय चौकशी करावी, बाधीत शेतकऱ्यांची मागणी.

अकलूज ( बारामती झटका )

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या दोन्हीही पालखी मार्गाचे महामार्गामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. त्यासाठी माळशिरस तालुक्यातील जमिनी भूसंपादन व निवाडा करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उपविभागीय कार्यालय अकलूज येथून केली जात होती. सदर कार्यालयात पालखी महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनी व मोबदल्यासाठी करण्यात येणाऱ्या निवाडा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार कार्यालयातील अव्वल कारकून अजित जाधव व कंत्राटी संगणक ऑपरेटर पल्लवी शिंदे यांनी खाजगी एजंट घाडगे, बनकर, भगत यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाच्या पैशावर डल्ला मारण्याचा अनागोंदी कारभार केलेला आहे. खाजगी एजंट यांनी नातेवाईकांच्या नावे बनावट दाखले, वाढीव व्हॅल्युएशन करून शासनाच्या पैशाची लयलूट केलेली आहे. कार्यालयीन कर्मचारी कंत्राटी कर्मचारी व एजंट यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी बाधित शेतकर्यांनी केलेली आहे.

प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी प्रांत कार्यालयातील अजित जाधव यांचा पदभार काढून कंत्राटी संगणक ऑपरेटर पल्लवी शिंदे यांना काढून टाकलेली बातमी बारामती झटका यांनी प्रसिद्ध केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयामध्ये भूसंपादन व निवाडा प्रक्रियेमधील सावळा गोंधळ प्रत्यक्ष भेटून सांगितलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केलेल्या आहे. काही शेतकऱ्यांकडे आर्थिक व्यवहाराचे व्हिडिओ शूटिंगवर रेकॉर्डिंग आहे, असे शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे.

बाधित शेतकऱ्यांनी सांगितलेली धक्कादायक माहिती अशी की, पालखी महामार्गासाठी भू संपादित केलेल्या जमिनीमध्ये घरे नसताना बनावट घरे दाखवून लाखो रुपये काढलेली आहेत. काही घराला व्हॅल्युएशन वाढवून कोट्यावधी रुपये दिले आहेत. पाईप लाईनसाठी लाखो रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे. असे कोट्यावधी रुपये शासनाचे एजंटचे नातेवाईक यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत. भूसंपादन करताना झाडांची संख्या आणि मोबदला देत असताना अचानक झाडांची संख्या वाढवलेली आहे. प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अशा अनेक विभागातील संबंधित अधिकारी यांना चिरीमिरी देऊन अहवाल बनवून घेतलेले आहेत. सर्व निवाडे राष्ट्रीय महामार्गाकडून मंजूर करून घेतल्यानंतर शेतकरी यांचेकडून तीन टक्के पासून सात टक्के पर्यंत रक्कम घेतल्यानंतर पैसे खात्यावर वर्ग केले जात होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्यांचे टक्केवारी दिली जात नव्हती त्यांचे निवडे प्रलंबित जाणीवपूर्वक ठेवले जात होते. शेतकऱ्यांनी सांगितले प्रांत अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे अव्वल कारकून अजित जाधव व खाजगी संगणक ऑपरेटर पल्लवी शिंदे सांगत होत्या, असे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले. टक्केवारी देणाऱ्या व बोगस काम करून घेणाऱ्या एजंटांच्या फायली लवकर मंजूर होत होत्या.

सध्याचे प्रभारी प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना अंधारात ठेवून अव्वल कारकून अजित जाधव खाजगी संगणक ऑपरेटर पल्लवी शिंदे व घाडगे, बनकर, भगत एजंट यांनी शासनाच्या पैशाची लूट केलेली आहे. कोट्यावधी रुपयाचा शासनाच्या पैशाचा अपहार झालेला आहे, असा शेतकऱ्यांनी दावा केलेला आहे. यासाठी तीन महिन्याच्या कालावधीतील जरी मूल्यांकन, बाधित शेतकऱ्यांनी जोडलेली कागदपत्रे, बांधकाम विभागाचा अहवाल जीवन प्राधिकरणाचा अहवाल अशी कागदपत्रे तपासल्यानंतर भ्रष्टाचार बाहेर येईल. पीडित शेतकऱ्यांनी एजंटचे नातेवाईक यांची नावे सुद्धा सांगितलेली आहेत. काही शेतकऱ्यांनी लेखी पत्र देऊन जबाबसुद्धा दिलेला आहे.

लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कार्यालयातील कर्मचारी, कंत्राटी, कर्मचारी व एजंट यांनी केलेल्या संगनमताने भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी माहिती उपलब्ध आहे. अजून पीडित शेतकरी यांच्याकडे काही माहिती असल्यास संपादक श्रीनिवास कदम पाटील 98 50 10 49 14 या नंबरशी संपर्क साधावा. पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल ठाम उभा राहणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशरदचंद्रजी पवार यांच्या जातीयवादावर क्ष-किरण : विजय चोरमारे
Next articleह.भ.प. गायनाचार्य गलांडे महाराज लासुर्णे यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here