धरण प्रशासनाचा नीरा नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

पुणे (बारामती झटका)

पुण्यातील वीर धरणातून नीरा नदीत ९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९च्या सुमारास पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. वीर धरणातून नीरा नदीत ५७३७ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, वीर धरणातील उजवा कालव्याच्या विद्युत गृहातून ८०० क्युसेक्स आणि डाव्या कालव्याच्या विद्युत गृहातून ३०० क्युसेक्सने विसर्ग नदीपात्रात सुरू होता. वीर धरणाच्या सांडव्यातून ९ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ४६३७ क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आत्ताच्या घडीला नीरा नदीपात्रात एकूण ५८३८ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार निसर्गात बदल होऊ शकतो, असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी परिवर्तन मेळाव्याचे आयोजन
Next articleसमाजसेविका रेश्माताई टेळे यांचे नगरसेविका झाल्या तरीसुद्धा समाजसेवेचे व्रत सुरूच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here