न्यायालयाच्या निर्णयानंतर सदस्य यांच्यामधून सरपंच पदाची निवड केली जाणार असा ग्रामपंचायत सदस्यांचा निर्णय.
धर्मपुरी ( बारामती झटका )
धर्मपुरी गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच बाजीराव काटकर यांना विभागीय आयुक्त यांनी अपात्र केल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदावर कोणाचीही नेमणूक झालेली नसून सरपंच पदाचा अथवा सहीचा अधिकार कोणाकडेही नाही असे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर सुरेश झेंडे यांनी सांगितले.
धर्मपुरी ग्रामपंचायत दिनांक 24/ 12 /20 21 रोजी दुपारी एक वाजता उपसरपंच यांना सहीचे अधिकार देण्याबाबत मासिक मीटिंग सदस्यांची झाली यावेळेस नऊ सदस्य उपस्थित होते.यामध्ये उपसरपंच सौ सुनिता बाबासो माने यांच्याकडे सरपंच पदाच्या सहीचा अधिकार देऊ नये असे सदस्यांनी लेखी दिलेले होते त्यावेळेस ग्रामसेवक मोरे भाऊसाहेब यांनी हात वर करून मतदान घेण्याचे ठरवले त्यातील एक सदस्य गजानन पाटील यांनी समर्थन दिले तर उपसरपंच यांना सहीचा अधिकार देऊ नये यावेळी दादा पाटोळे, सुरेश कर्चे ,महेश कुलाळ, सागर झेंडे ,रूपाली जाधव, पुष्पा झेंडे ,संगीता मसुगडे, सुनिता भोईटे यांनी कडाडून विरोध केला.
ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही सदरच्या ठरावावर वरिष्ठ कार्यालय पंचायत समिती माळशिरस किंवा जिल्हा परिषद सोलापूर यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे.
लोकनियुक्त सरपंच बाजीराव काटकर यांनी विभागीय आयुक्त व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधामध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे दाद मागण्याकरिता रिट याचिका दाखल केलेली आहे. 5 जानेवारी 2022 रोजी न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या मधून सरपंच पदाची निवड केली जाईल असा ग्रामपंचायत सदस्यांचा निर्णय असल्याचे सागर सुरेश झेंडे यांनी सांगितले.
सरपंच पदाचा पदभार देण्यात आलेल्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये गावातील लोकांनी गैरसमज करून घेऊ नये असेही सागर झेंडे यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng