माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील भिमनगर धर्मपुरी येथील नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 323 20 21 भा. द. वि. 307, 302, व आर्म अॅक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यात मयत व आरोपी हे पती पत्नी असून सासु जखमी आहेत. आरोपी हा मयत पत्नीवर सासरी नांदत असताना चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असत. दीड वर्षापासून मयत पत्नी माहेरी राहत होती. ती परत आरोपी सोबत नांदण्यास येत नसल्याने दि. 17/9/2021 रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपीने पत्नीच्या माहेरी जाऊन मयत व जखमी ( पत्नी व सासू ) यांच्यावर तलवारीने वार केले. आरोपीची पत्नी मयत असून सासू सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचार घेत आहे. आरोपीस नातेपुते पोलीस स्टेशन यांनी दि. 18/9/2021 रोजी अटक करून मे. न्यायालय माळशिरस हजर केले असता दि. 23/9/2021 पर्यंत पोलीस कोठडी दिलेली होती. आज न्यायालयात हजर केले असता, सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी आरोपीस पोलिस कस्टडीची मागणी केली होती. त्या मागणीस आरोपीचे वकील ॲड. प्रशांत रुपनवर यांनी आरोपीची बाजू मांडून युक्तिवाद केला होता. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्यायालय यांनी आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली. ॲड. प्रशांत रुपनवर यांना ॲड. शहाजी मगर, ॲड. धनंजय सर्जे, ॲड. राहुल लवटे, ॲड. मनोज जाधव, ॲड. रोहित उराडे, ॲड. ज्ञानदेव कचरे ,ॲड. जयसिंग कचरे ॲड. सागर भांगे यांनी सहकार्य केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng