धर्मपुरी येथे ह.भ.प. गणेश महाराज वारिंगे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम.

स्वर्गीय सौ. हिराबाई विश्वनाथ ठेंगील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

धर्मपुरी ( बारामती झटका )

धर्मपुरी ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक विश्वनाथ बाबू ठेंगील यांच्या धर्मपत्नी सौ. हिराबाई विश्वनाथ ठेंगील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि. 14/4/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये धर्मपुरी नजीक हनुमान नगर येथे ह.भ.प. गणेश महाराज वारिंगे यांच्या सुश्राव्य किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मित्रपरिवार नातेवाईक यांनी प्रथम पुण्यस्मरणास उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त ठेंगील परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

धर्मपुरी गावामध्ये ठेंगील परिवार एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत दरिद्री संसाराला स्वर्ग बनविण्यात हिराबाई ठेंगील यांचे अतोनात कष्ट व परिश्रम आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा हिराबाई ठेंगील पुढे नेत होत्या. पती विश्वनाथ बाबू ठेंगील धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सलग पाच वर्ष संचालकपदी ् कार्यरत होते. हिराबाई आणि विश्वनाथ यांना तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. एक मुलगा बारामती सहकारी बँक सोलापूर येथे मॅनेजर पदावर कार्यरत आहे, दोन मुले शेती व्यवसाय करीत आहेत. त्यापैकी एक मुलगा धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संचालक पदावर कार्यरत आहे. हिराबाई यांची नात सून सौ. स्वरूपा संतोष ठेंगील धर्मपुरी ग्रामपंचायतच्या सदस्या आहेत. असा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ठेंगील परिवार आहे. ठेंगील परिवाराचा सुस्थितीत संसाराचा गाडा सुरू होता‌.

कोणाला वाटलं नव्हतं असे अघटित घडून येईल, चालता बोलता देव तुम्हाला असे दूर नेईल ||
माणुसकी स्नेह माया ममतेची यावेळी चर्चा होईल, त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल ||

अशा सर्वगुणसंपन्न असणाऱ्या स्वर्गीय सौ.‌ हिराबाई विश्‍वनाथ ठेंगील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसाद कार्यक्रमासाठी मित्र परिवार नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ठेंगील परिवार धर्मपुरी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपिसेवाडीतील माळी समाजाची पैशापेक्षा पक्ष व नेत्यांवरील निष्ठा श्रेष्ठ ठरली.
Next articleमाळशिरस पंचायत समितीच्या वतीने तेल्या भुत्याच्या कावडीचे जंगी स्वागत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here