धर्मपुरी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचा धुरळा उडाला.

शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय सर्वच जागांवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व.

धर्मपुरी ( बारामती झटका )

धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित धर्मपुरी ता. माळशिरस या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक सण 2021 – 22 ते 2026 -27 निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडी पॅनल चा सत्ताधारी गटाने धुराळा उडवून दिलेला आहे. शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय होऊन सर्वच जागांवर सत्ताधारी गटाचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झालेले आहे.
शेतकरी विकास पॅनल विजयकुमार तानाजीराव पाटोळे, दादा कृष्णा काटकर, उत्तम निगडे, संभाजी पाटील, बाजीराव सुदाम काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर परिवर्तन विकास आघाडी नितीन निगडे, नामदेव निटवे, संजय झेंडे, प्रदीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या निवडणूकीत 26 उमेदवार आमने सामने उभे होते. सत्ताधारी गटाने विरोधी गटाचा धुराळा उडवून दिलेला आहे.


सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात धायगुडे अशोक जगू 175, जैन महावीर धनपाल 168, जैन संतोष धनपाल 277, काटकर हरिश्‍चंद्र गणपत 273, केंजळे कृष्णात प्रभू 165, केंजळे विष्णू प्रभू 260, माने संदीप एकनाथ 186, मसुगडे चंद्रकांत धोंडीबा 269, मसुगडे लालासो आनंदा 167, मसुगडे सुनील आण्णा 154, मोरे मोहन भानुदास 268, निगडे चंद्रकांत तुकाराम 161, निगडे महावीर रामचंद्र 269, पाटील नानासो बाळासो 275, पाटील संभाजी भिमराव 275, झेंडे नारायण चोखा 163 अशी मते पडलेली आहेत.
तर महिला राखीव गटात पाटील शशिकला अरुण 297, पाटोळे सारिका लालासो 304, वाघमोडे रुक्मिणी विष्णू 157, झेंडे सकुबाई महादेव 160 अशी मते पडलेली आहेत. इतर मागास वर्ग गटात राऊत भारत पांडुरंग 291, कर्चे पोपट संभाजी 178 अशी मते पडली आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात पाटील किरण चंद्रकांत 192, माने मंगल सोपान 278 अशी मते पडलेले आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात झेंडे नारायण चोखा 183, झेंडे महादेव नाथा 288 अशी मते पडलेली आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. सोसायटीचे माजी चेअरमन स्वर्गीय तानाजीराव पाटोळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. फटाक्यांची आतीषबाजी व गुलालाची उधळण करत विजयी उमेदवार ढोल-ताशाच्या गजरात ग्रामदैवताचे आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleघुलेनगर येथे शिखर शिंगणापूर यात्रेसाठी जाणार्‍या भक्तांसाठी, फलटन धुळोबा भिवाई व पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी पाणपोईचे नियोजन
Next articleरत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल दोशी यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here