धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने विरोधकांचा केला सुपडा साफ
धर्मपुरी ( बारामती झटका )
धर्मपुरी ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने दणदणीत विजय मिळवून सर्वच्या सर्व 13 जागा विजयी करून विरोधकांचा सुपडा साफ केलेला होता. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे एस. व्ही. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना संस्थेचे सचिव बापूराव पाटील यांनी सहकार्य केले.
चेअरमन पदासाठी संभाजी भिमराव पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी चंद्रकांत मसुगडे दोघांचे एकमेव अर्ज आलेले होते. यावेळी नूतन संचालक विष्णू केंजळे, मोहन मोरे, संतोष जैन, हरिश्चंद्र काटकर, नानासो पाटील, भास्कर झेंडे, महावीर निगडे, भारत राऊत, शशिकला अरुण पाटील, मंगल सोपान माने, सारिका लालासो पाटोळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन पदी बिनविरोध संभाजी पाटील व व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत मसुगडे यांची नावे जाहीर केली.

धर्मपुरी विकास सेवा सोसायटी विजय कुमार तानाजीराव पाटोळे, बाजीराव सुदाम काटकर, उत्तम निगडे, बबन पाटील, विजय पाटोळे, प्रकाश मसुगडे, गुलाबराव ठेंगील, उमेश मसुगडे, दादा काटकर, गोरख काटकर, नवनाथ पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांनी विजय संपादन केलेला होता. चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी सर्व प्रमुख मंडळी उपस्थित होती.

निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. कोरे यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची घोषणा केल्यानंतर फटाक्यांची आतीषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng