धैंचा हिरवळीचे खत बियाणे वाटप करून युरिया किंमत वाढवर उपायाचा शुभारंभ !!

लोणंद (बारामती झटका)

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमामधून लोणंद व लोंढे मोहितेवाडी या गावातील ग्रामसभेने निवडून दिलेल्या ५४ लाभार्थीना ५८ हेक्टर क्षेत्रासाठी १३ क्विं १.१६ लाख किमतीचे बियाणे वाटप श्री. नाळे कृस श्री. साळूखे कृप व श्री. कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांच्याहस्ते वाटप करून ग्रामपंचायत लोंढे मोहितेवाडी येथे शुभारंभ करण्यात आला.

या प्रकल्पाअंतर्गत निवडलेले लाभार्थी येत्या खरिप हंगामात पाऊस सुरु झाला की, सरळ पीक व पट्टा पद्धतीने लागवड करणार आहेत. धैंचा या हिरवळीचे खत बियाणामुळे हेक्टरी ७० किलो नत्र म्हणजे ३ पोती युरिया ६९० किमतीचे जैविक नत्र उपलब्ध करून मिळणार आहे. जैविक नत्राबरोबर जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढून जैविक सुपीकता, पाणी धारण क्षमता वाढणे, सुक्ष्म जीवाचे प्रमाण वाढून हवापाणी याचा समतोल राहून जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढीस मदत होणार आहे. म्हणजेच या प्रकल्पातून १६२ पोती ३७२६० किमीच्या युरियाची बचत होणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी खरिप हंगामात हिरवळीचे बियाणे वापरून जमिनीचे आरोग्य सुधारणे रा. खतावरील खर्च कमी करणे व युरिया किंमत वाढवरील कमी खर्चाचा उपाय अवलंब करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते, कार्यालय यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात आरटीओ कार्यालय आहे, हे सांगायला लाज वाटत आहे.
Next articleकेतकी चितळे विरुद्ध पैठण पोलीस स्टेशनला राजू पाटील बोंबले यांची तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here