धैर्यशीलभैया गतीमान युगाचा कृतिशील नेता – संग्रामसिंह रणनवरे इनामदार.

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे संघटनमंत्री, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील उर्फ भैय्यासाहेब राजकारणातील चाणक्य, हजरजबाबी, स्पष्ट बोलणारा नेता, दिलेल्या शब्दाचा पक्का माणूस, मदत करणारा दयावान, शिक्षण, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारे भैय्यासाहेब गतीमान युगाचे कृतिशील नेते आहेत‌. अशा धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवामृत दूध संघाचे संचालक मांडकी गावचे माजी सरपंच माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील युवा नेते संग्रामसिंह रणनवरे इनामदार यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचा जाणता राजा ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने धैर्यशिलभैया यांची सर्वच क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू आहे. धैर्यशील भैया यांनी आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून माळशिरस पंचायत समितीचे सभापती, सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते अशा अनेक पदावर काम केलेले आहे.

राजकारणामध्ये कार्य करीत असताना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी माणूस केंद्रस्थानी ठेवून समाज हिताची केलेले कामे तेच विजयदादा आणि बाळदादा यांनी केले. तोच वसा आणि वारसा रणजीतदादांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशीलभैया यांचा सुरू आहे. विषय गंभीर तिथे धैर्यशील भैया खंबीर असा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये धैर्यशील भैया यांची वाटचाल सुरू आहे. समाजामध्ये राजकारण व समाजकारण करीत असताना सर्वसामान्य जनतेला दिलासा व मदत करीत असल्याने सर्व जाती धर्मातील लोक धैर्यशीलभैया यांना दयावान म्हणतात.

स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी नॉलेज सिटीची निर्मिती केली. शिक्षणाबरोबर शरीर संपदा व्यवस्थित राहावी यासाठी शिवरत्न कुस्ती केंद्र व ताराराणी कुस्ती केंद्राची निर्मिती केली. माळशिरस तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात कार्यातून धैर्यशिल भैय्या यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत, सहकार्य व योग्य मार्गदर्शन करीत असतात. महाराष्ट्रात खाजगी दूध संघामध्ये शिवामृत दूध संघ सभासदांचे हित जोपासणारा एकमेव संघ आहे. राजकारणातील चाणक्य असणाऱ्या धैर्यशील भैया यांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या घडामोडीच्या राजकारणात धैर्यशील भैया यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे.

विजयदादांना बाळदादांची जशी साथ होती, तशीच रणजीतदादांना धैर्यशील भैया यांची मोलाची साथ मिळत आहे. रणजीतदादांच्या मार्गदर्शनाखाली समाजामधील समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी सुरू आहे. क्षेत्र कोणतेही असो मदत करणे ही मोहिते पाटील घराण्याची परंपरा आहे. गरीब परिस्थितीतील विशाल उर्फ प्रकाश बनकर यांना मोहिते पाटील परिवाराने पाच लाख रुपये आर्थिक मदत केली. यामध्ये धैर्यशीलभैया यांनी पुढाकार घेतलेला होता.

विजयदादा बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीतदादा यांच्या सहकार्याने धैर्यशील भैया यांची सर्वच क्षेत्रात राजकीय घोडदौड सुरू आहे. त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. शितलदेवी वहिनी यांची मोलाची साथ मिळत आहे. अशा गतिमान युगातील कृतिशील नेता असणारे धैर्यशील मोहिते पाटील उर्फ भैय्या यांना वाढदिवसाच्या रणनवरे इनामदार परिवार यांच्यावतीने शिवामृतचे संचालक संग्रामसिंह रणनवरे इनामदार यांच्यावतीने शब्द सुमनाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleНеправильно Считается Валовая Прибыль В 1с Инструкция Как Решить
Next articleअकलूज विकास सेवा सोसायटीची व्यवस्थापक समिती निवडणूक बिनविरोध.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here