अकलूज ( बारामती झटका )
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्ष नेते माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती, भारतीय जनता पार्टीचे संघटनमंत्री धैर्यशील मोहिते पाटील उर्फ धैर्यशीलभैय्या यांचा वाढदिवस संपन्न झाला. वाढदिवसाचे जनहितार्थ सामाजिक उपक्रम कार्यक्रम व वाढदिवसा करता शुभेच्छा देण्याकरता आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मोहिते-पाटील यांच्या राजकीय गतवैभव प्राप्तीसाठी दिशा देणारा वाढदिवस ठरेल, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत माळशिरस तालुक्याचे नंदनवन केले. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून माळशिरस तालुक्यात प्रतिकूल परिस्थिती चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंत्रिमंडळामधील विविध खात्याचा पदभार सांभाळून माळशिरस तालुका जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये चौफेर विकास केलेला आहे.
विकासरत्न विजयदादा यांचा चाळीस वर्षाचा दैदिप्यमान राजकीय कालावधी गेलेला आहे. मोहिते पाटील यांचे गेल्या दशकापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह आणि नवीन नेतृत्व यामुळे राजकीय गळचेपी सुरू होती. पक्षांतर्गत घुसमट सुरू असताना पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडत गेल्या सोलापूर जिल्हा परिषद व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोहिते पाटील यांचे एकहाती असणारे राजकीय नेतृत्व विस्कळीत झाले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडी विस्कळीत झालेली होती.
मोहिते पाटील यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले मल्ल दंड थोपटू लागले. दुसऱ्या राजकीय तालमीत तयार झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले. मोहिते पाटील यांचे अनेक नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर राजकीय उपकार विसरून मोहिते पाटील यांचा राजकीय विसर पडू लागला. दिवसेंदिवस मोहिते पाटील यांचे असणारे राजकारणातील वैभव कमी होऊ लागले. नेते व कार्यकर्ते यांनी मोहिते पाटील यांचे राजकीय अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला.
मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आपले राजकीय अस्तित्व आहे, हे सिद्ध करून दाखविले. माढा लोकसभा खासदार, माळशिरस विधानसभा आमदार, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, माळशिरस पंचायत समिती सभापती अशा ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता उलथून भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व निर्माण केलेले आहे.
भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर रणजितसिंह मोहिते पाटील यांना आमदार केलेले आहे तर, संघटन महामंत्री पदाची जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिलेली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात रणधैर्य राम-लक्ष्मणासारख्या बंधूंनी नव्याने मोट बांधण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यात व धैर्यशील मोहिते पाटील यांचे जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याचे काम सुरू आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी खाजगीकरणाच्या आजच्या स्पर्धेच्या युगात शिवामृत दूध उत्पादक संघातील कमी झालेले दूध वाढवलेले आहे. शिवरत्न शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नॉलेज सिटी येथे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची काम केले जाते. शिवरत्न कुस्ती केंद्र व ताराराणी कुस्ती केंद्रातून भारताची सशक्त व बलदंड अशी नवीन पिढीतील तरुण-तरुणी बनावी, यासाठी सुसज्ज कुस्ती केंद्रांची निर्मिती केली. यामुळे अनेक गावातील नेते व कार्यकर्ते जोडले गेले.
धैर्यशीलभैया यांच्या वाढदिवसाला अनेक ठिकाणी सामाजिक समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. वाढदिवसादिवशी अनेक कार्यकर्ते नेते यांनी स्वयंस्फूर्तीने वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता अलोट गर्दी केली होती. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्याकरता वर्दळ सुरू होती. आलेल्या कार्यकर्त्यांना नाष्टा पाण्याची सोय केलेली होती. सर्वच क्षेत्रातील नेते कार्यकर्ते व तरुणांनी गर्दी केलेली होती. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉटर्स मॉम्स फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्याची साथ मिळत आहे. मोहिते पाटील यांनी नव्याने सुरु केलेल्या कार्याची पोचपावतीच म्हणावी लागेल.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस, महाळुंग या नगरपंचायत निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी करिष्मा दाखविलेला आहे. सध्या सुरू असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्येही मोहिते-पाटील यांचे वर्चस्व सुरू आहे. आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये सुद्धा मोहिते पाटील यांचा राजकीय करीश्मा दाखविण्यासाठी आम्ही नेते व कार्यकर्ते सज्ज आहोत, असाच इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने दाखवून दिलेला आहे. त्यामुळे धैर्यशीलभैया यांचा वाढदिवस मोहिते पाटील यांचे राजकीय गतवैभव प्राप्त करण्यासाठी दिशा देणारा ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मधून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng