धैर्यशील मोहिते-पाटील यांचे जानकर परिवारांच्या वतीने जंगी स्वागत.

श्रीमती जगूबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत पाण्याची मोट, इंजिन चालवून पाणी काढले आधुनिक युगात सूर्यकिरणावर मोटार पंप चालवून पाणी काढलेले पाहण्याचा योगायोग ” याच देही याची डोळा पाहण्याचा अनुभव.


तरंगफळ ( बारामती झटका )

शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांचा तरंगफळ येथील जानकर परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड, ज्येष्ठ नेते एडवोकेट शांतीलाल तरंगे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष महादेवराव तरंगे, माळशिरस वन विभागाचे अधिकारी साळुंके साहेब, सोलापूर जिल्हा बँकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव सिनियर बँक इन्स्पेक्टर यु एम दीक्षित, इन्स्पेक्टर बी.एम. हांगे, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सतीश कोळेकर ,कृषी सहाय्यक शिंदे, शिवामृत सेंटर चे चेअरमन युवराज नरोटे संकलन अधिकारी दडस ,घोगरे, ग्राम विकास अधिकारी संतोष पानसरे, पंढरपूरचे सहाय्यक अभियंता सागर बनसोडे, तुकाराम जानकर, माजी चेअरमन बापू अण्णा तरंगे, धोंडाप्पा कर्णवर, विठ्ठल तरंगे, सुजित तरंगे, सुहास तरंगे, बापू तरंगे, श्रीहरी पानसरे, सुभाष पाटील, राजेंद्र तरंगे पाटील लोकमतचे पत्रकार एल.डी. वाघमोडे, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


तरंगफळ येथील सोलर कृषी पंपाचे उद्घाटन व विविध कार्यक्रमांचे आयोजन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरक जानकर यांच्या सोलार कृषी पंपाचे उद्घाटन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

सोलर पंप उद्घाटनानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांचे जानकर परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले धैर्यशील मोहिते-पाटील यांना सौ प्राजक्ता सागर बनसोडे व सौ ऋतुजा कुलदीप जानकर यांनी औक्षण करून स्वागत केले जानकर परिवार यांच्या वतीने गोरख जानकर यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सन्मान केला यावेळी श्रीमती जगुबाई जानकर, सौ रतनबाई जानकर, कुलदीप जानकर, जावई सागर बनसोडे उपस्थित होते.


तरंगफळ येथील मारुती जानकर व जोगुबाई जानकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपला संसार फुलविलेला आहे. पूर्वीच्या काळी लाईटची व्यवस्था ग्रामीण भागात कमी असत अशावेळी पाण्याची मोट बैलाच्या साह्याने अथवा इंजिन द्वारे पाणी शेतीला दिले जात होते. पूर्वीच्या काळी जानकर यांची परस्थिती प्रतिकूल व हलाखीची होती अशा कालावधीमध्ये मारुती जानकर यांनी शेळ्या-मेंढ्या गाई म्हशी यांचे पालन करून प्रपंच या सुरू होता पूर्वीच्या काळी रोजगार हमी योजनेवर बैलगाडीने दगड मुरूम वाहिले जात होते अशा प्रतिकूल परिस्थितीत मारुती जानकर यांना जगुबाई जानकर यांची मोलाची साथ होती जगुबाई जानकर यांनी इंजिन चालू करणे पाणी धरणे, बैलगाडी जुंपून शेतातील वैरण आणणे, शेतामध्ये बैलाच्या साह्याने नांगरटीसह मशागतीची कामे करत असत, मारुती व जगु बाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपला संसार फुलवला दोघांनी मिळून संसाराचा स्वर्ग बनवला आणि गेल्या तीन वर्षापूर्वी मारुती जानकर यांचे दुःखद निधन झालेले आहे. जगु बाई आपल्या पतीचे दुःख विसरून चिरंजीव गोरख यास मातृत्व आणि पितृत्वाची जबाबदारी पार पाण्यामध्ये सहकार्य करीत असतात जगु बाई यांचे वय झालेले असतानासुद्धा आज सुद्धा शेतामध्ये काबाडकष्ट करीत असतात गेल्या महिन्यामध्ये बाजरीची राखण गोपण हातात घेऊन राखण करीत होत्या त्यांचा फोटो महाराष्ट्रामध्ये आजीबाईची गोफण म्हणून लोकमतचे पत्रकार एलडी वाघमोडे यांनी वृत्तपत्रामध्ये झळकवलेला होता.

जगु बाई यांनी मुलावर सुनेवर प्रेम करून आपल्या नातवानं वर सुद्धा गोड कौतुकाची थाप कायम असते जगुबाई आजीच्या पणजी झालेल्या आहेत तरीसुद्धा त्यांच्या अंगामध्ये कोणत्याही कार्यात उत्साह असतो. सोलार कृषी पंपाच्या उद्घाटनाच्या वेळी उद्घाटक धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी हितगूज साधून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला होता.

त्यांनी पूर्वीच्या काळी प्रतिकूल परिस्थितीत मोट इंजिन चालवून पाणी काढून शेतीला दिले होते आधुनिक युगात सूर्यकिरणावर सोलार मोटर पंप चालून पाणी काढलेले पाण्याचा योगायोग याच देही याची डोळा पाहण्याचा अनुभव श्रीमती आजुबाई जानकर यांना आलेला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहावयास मिळत होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleऊसाच्या एफ.आर.पी.बाबत शेतकरी व साखर कारखाने यांचे मध्ये उडालेल्या गोंधळाचे वास्तव.- राजेंद्र तावरे पाटील .
Next articleफैसला क्या होगा वो वक़्त को मंजूर हैं लेकिन संघर्ष में कोई कमी नहीं छोड़ेंगे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here