श्रीपूर (बारामती झटका)
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला चांगलाच वेग आला असून कार्यकर्ते नेते यांच्यात कोणी कुठुन उभे रहायचे कोणाला सोबत घ्यायचे यांची जोरदार आखणी चाचपणी सुरू आहे वेळ कमी असल्याने अनेकांची धांदल उडाली आहे भाजपच्या वरिष्ठ सुत्रांकडून अशी माहिती आली आहे की महाळुंग श्रीपूर नगरपंचायत निवडून आणण्याची सर्व जबाबदारी सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे तरूण तडफदार आक्रमक भूमिका असलेले नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांचेकडे सोपविणार आहेत कोणत्याही परिस्थितीत महाळुंग श्रीपूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे येत्या दोन दिवसांत अकलूजला महाळुंग श्रीपूर मधील भाजपचे नेते कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे तर दुसरीकडे माढयाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाचे या भागातील नेते कार्यकर्ते यांच्याही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा कसल्याही परिस्थितीत महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीवर झेंडा फडकला पाहिजे या भुमिकेतुन व्युहरचना आखली जात आहे भाजप आरपीआय आठवले गट युती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात जरी निवडणूक धमासान होत असले तरी तेवढ्याच ताकदीने स्वतंत्र लढणारे अपक्ष उमेदवारांचे ही तगडे आव्हान असणार आहे निवडणूक नगरपंचायत ची असली तरी मोहिते-पाटील विरुद्ध बबनराव शिंदे गट यांच्यात अस्तीत्व नेतृत्व वर्चस्व शाबीत करणारी ठरणार आहे
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng