विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सभामंडपाचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार…
माळशिरस ( बारामती झटका )
पिरळे ता. माळशिरस येथील काशी विश्वेश्वर मंदिरासमोर विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार फंडातून आठ लाख रुपये सभामंडपाचे उद्घाटन सोमवार दि. 31/01/2022 रोजी सायंकाळी 5 वा. 15 मिनिटांनी शिवामृत सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन व भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटक धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते काशी विश्वेश्वर मंदिर पिरळे येथील नरोळेमळा येथे संपन्न होणार आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती सौ. शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक बी. वाय. राऊत, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा परिषद सदस्या साक्षीताई सोरटे, पंचायत समिती सदस्या विद्याताई वाघमोडे पाटील, कळंबोलीचे सरपंच संजय वाघमोडे, दहीगावचे सरपंच रणधीर पाटील, एकशिवचे सरपंच शहाजी धायगुडे, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी आशिष आनंद आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदरच्या सभामंडपासाठी पाच गुंठे जागा बक्षीसपत्र करून देणारे कोंडीराम विष्णू नरोळे व भारत विष्णू नरोळे यांचा सन्मान उपस्थितांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तरी सदरच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे, असे पिरळे ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका रामलिंग नरुळे, उपसरपंच श्रीमती कमल दादा खिलारे, ग्रामसेविका श्रीमती एस.सी. साळवे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पिरळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng