धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धानोरे गावचे देवकते यांचा जागरण गोंधळ कार्यक्रम संपन्न.

वेळापूर ( बारामती झटका )

शिवामृत दूध संघाचे चेअरमन सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे संघटन मंत्री वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीचे चाणक्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी खास आवर्जून धानोरे गावचे देवकते सध्या वेळापूर नंदनवन येथे वास्तव्यास असलेले देवकते परिवार यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमास खास उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

धानोरे गावचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ देवकते, माजी उपसरपंच उत्तमराव देवकते, माजी सरपंच नामदेव देवकते, डॉ. आबासाहेब देवकते व देवकते परिवार यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. वेळापूर व धानोरे पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी या जागरण गोंधळ कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली होती. तर, हजारो लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. मात्र विशेष उपस्थिती धैर्यशील मोहिते-पाटील यांची होती.

त्यांच्यासमवेत वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन भाजपचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह देशमुख, सहारा इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉ. राहूल जवंजाळ, वेळापूर ग्रामपंचायत सदस्य सुनील मुंगूसकर, गणेश चव्हाण, युवा नेते ओंकार माने देशमुख यांच्यासह अनेक मोहिते पाटील प्रेमी उपस्थित होते. धैर्यर्शील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

त्यांच्या समवेत सुनील मुगुसकर, गणेश चव्हाण, ओंकार माने देशमुख अशी त्रिमूर्ती असल्यामुळे सोसायटीसारख्या पुढील निवडणुकीच्या कार्यक्रमात कोणाचा तरी करेक्ट कार्यक्रम होणार, अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात पुणे-पंढरपूर शिवशाही बसचा टायर पेटला, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला.
Next articleराजकीय हेतूने व्यक्तिगत स्वार्थासाठी अधिकाऱ्यांवर आरोप करणे चुकीचे – महादेव गायकवाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here