धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते तरंगफळ येथे सोलार कृषी पंपाचे उद्घाटन

माळशिरस तालुक्यातील अधिकारी व महिंद्रा अँड महिंद्रा सोलार कंपनीचे करण निकम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार.


तरंगफळ ( बारामती झटका )

तरंगफळ तालुका माळशिरस येथे शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सोलार कृषी पंपाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोंबर 20 21 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे तहसीलदार जगदीश निंबाळकर गटविकास अधिकारी श्रीकांत खरात वन अधिकारी कोकरे साहेब तालुका कृषी अधिकारी विराज पाटील ाळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक रत्‍ना गायकवाड महेंद्रा अंड महेंद्रा सोलार कंपनीचे महाराष्ट्राचे प्रभारी करण निकम महावितरणचे अधिकारी प्रवीण कुंभारे रजपुत वनपाल साळुंके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरंगफळ येथील प्रगतशील बागायतदार एडवोकेट शांतीलाल उत्तमराव तरंगे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर प्रगतशील बागायतदार महादेव उत्तमराव तरंगे व अन्य दोन अशा 5 सोलार कृषी पंपाचे उद्घाटन धैर्यशील मोहिते-पाटील व माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. वन विभाग कृषी विभाग व पंचायत समिती यांच्या मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी तरंगफळ पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन तरंगे व जानकर परिवार यांचेकडून करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनाथासाहेब शेगर यांनी प्रतिकूल परस्थितीत समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. – ह.भ.प.प्रा. प्रसाद महाराज माटे चऱ्होलीकर.
Next articleॲट्रॉसिटीच्या समर्थनार्थ माळशिरस तहशील कार्यालयावर बहुजन विराट मोर्चाचा कार्यक्रम संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here