नंदुरबार जवळील जामदे गावामध्ये चालू कीर्तनात ह.भ.प. ताजोद्दिन महाराज शेख यांचे देहावसान!

‘शुर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी’

संभाजीनगर (बारामती झटका)

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रहीवासी थोर कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांनी काल नंदुरबार येथे जामदे गावांमधील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये किर्तन सुरु असतानाच देह ठेऊन जगाचा निरोप घेतला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कर्तनाची ह.भ.प. तजोद्दिन महाराज शेख हे मुस्लीम असताना कट्टर हिंदू प्रेमी होते. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये कीर्तने केली होती. शिवसेनेचे प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा अनेक कार्यक्रमात ह.भ.प.ताजोद्दीन महाराज शेख यांनी आपले किर्तन केले असल्याचे त्यांच्या अनुयायांनी सांगितले.

यावेळी ह.भ.प. शेटे महाराज म्हणाले की, ह.भ.प. ताजोद्दीन महाराज यांचा जन्म जरी मुस्लीम समाजात झाला असला तरी त्यांनी किर्तनाच्या माध्यमातुन हिंदु धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. ह.भ.प. ताजोद्दीन महाराज नेहमीच किर्तनात सांगत असतात विश्वात हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ कोणता धर्म नाही. वारकरी सांप्रदायासारखा सांप्रदाय नाही. गिता, भागवत, गाथा, ज्ञानेश्वरी यांच्यासारखे श्रेष्ठ ग्रंथ नाही. एवढेच नव्हे तर हिंदु धर्मात ज्यांचा जन्मा झाला त्यांनी प्रत्येकांनी माळ घालायला पाहीजे, असे आव्हान महाराज कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी करत होते. ह.भ.प. ताजोद्दीन महाराज यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. मी विदर्भामध्ये महाराजांचे बरेच कीर्तनाचे कार्यक्रम घेतले आहेत. महाराजांचा संभाजीनगर येथे फार मोठा आश्रम असून त्यांचा मनमिळावू स्वभाव, कट्टर हिंदुत्ववादी विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व खडा पहाडी आवाज हे महाराजांचे वैशिष्ट्य होते.

असं म्हणतात, ‘शूर ओळखावा रणी, आणि साधू ओळखावा मरणी’, भजन करत असताना मरण येणे हे फार मोठ्या साधूत्वाचे लक्षण आहे. नंदुरबार जवळील जांबे गावातील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनातील विषय भजनाचा चालू होता. आणि ‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावेते’ हे प्रमाण चालू असताना अचानक महाराजांना चक्कर आल्यासारखे झाले आणि चालू कीर्तनात खाली बसल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने महाराजांना देवाज्ञा झाली. खऱ्या अर्थाने म्हणावे लागेल, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा.
अशा या महान संत विभूतीला सर्व वारकरी सांप्रदायाच्या सर्व साधक मंडळींच्यावतीने व विश्व वारकरी सेनेच्यावतीने भावपुर्ण श्रद्धांजी मी अर्पण करतो, असे सांगत ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी त्यांच्या जुन्या आठवनींना उजाळा दिला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article…अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
Next articleजयंतराव, हाच का तुमचा सुसंस्कृतपणा…!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here