नगरसेवक संतोषआबा वाघमोडे मित्रपरिवार यांच्यावतीने गोरडवाडीचे बिनविरोध सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा सन्मान.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष नगरसेवक युवानेते संतोषआबा वाघमोडे मित्र परिवाराच्यावतीने गोरडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. विष्णूभाऊ गोरड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माळशिरसचे नगरसेवक श्री. संतोषआबा वाघमोडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती रमेश धाईंजे, यशवंत मोहिते, योगेशभैय्या पुराणिक, बापू क्षीरसागर, बाळासाहेब वाघमोडे, तानाजी केंगार, सतीश मदने, सचिन माने आदी उपस्थित होते.

गोरडवाडी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विष्णूभाऊ गोरड यांची कमी वयामध्ये वर्णी लागलेली असल्याने माळशिरस तालुक्यातून त्यांचा गुणगौरव व सन्मान केला जात आहे. माळशिरस येथील संतोषआबा वाघमोडे यांच्या संपर्क कार्यालयात मित्र परिवाराच्यावतीने नवनियुक्त सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा सन्मान संपन्न झाला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअन्न व्यावसायिकांनी विक्री देयकावर नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक
Next articleविठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा दीपावलीनिमित्त सभासदांच्या घरपोच साखर वाटपाचा शुभारंभ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here