नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

माळशिरस (बारामती झटका)

       महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी आज माळशिरस येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नवाब मलिक यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

      सदर निवेदनात असे म्हटले आहे की, मंत्री नवाब मलिक यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सोबतचे आर्थिक गैरव्यवहार स्पष्टपणे उघड होत आहेत. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन स्वस्तात विकत घेतली, मालिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. कुर्ल्यातील एलसीबी रोडवरील जागेशिवाय मलिकानी अन्य चार ठिकाणी स्वस्त जमिनी खरेदी केली आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी यापुढे उग्र आंदोलन करेल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. 

       यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रताप पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, सरचिटणीस संदीप घाडगे, दत्तात्रय भिलारे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दादासाहेब खरात, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने, डॉ. अक्षय वायकर, महादेव कावळे, चिटणीस सुनील बनकर, चिटणीस हनुमंत कर्चे, हनुमंत दुधाळ, हनुमंत सरगर, संतोष महामुनी, राजेंद्र वळकुदे, नागेश भोसले, रशीद मुलाणी, सचिन रणवरे, केशव कदम, कांताआबा मगर आदी उपस्थित होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून माळशिरसचे पोलीस निरीक्षक दीपक गायकवाड यांनी चोख बंदोबस्त लावला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवासोट्या इतकीच खबरदारी सर्व गडकिल्ल्यांवर घेण्यात यावी, वनविभागाचे केले कौतुक
Next articleसंपत्ती कमावताना संतती सुसंस्कारित होईल याकडे लक्ष द्या – ह.भ.प. शेटे महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here