नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी १४ मार्चला लिपिक कर्मचाऱ्यांचा संप…

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने माळशिरसचे प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख व गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत.

माळशिरस ( बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने नवीन पेन्शन योजना एमपीएस बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करा .जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे ग्रेड पे आणि सातवे वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, या मागण्यासह अनेक मागण्यांचे निवेदन माळशिरसचे प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांना निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना शाखा माळशिरस यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यावेळी माळशिरस शाखाध्यक्ष राजकुमार राऊत, पंचायत समिती मधील कदम साहेब, गुगळ साहेब आदींसह पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, अप्पर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना देण्यात आल्या आहेत. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर दि. १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपोषणाला अखेर यश आले…
Next articleशिवसेना उपतालुका प्रमुख पदी सतीश रुपनवर यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here