नवी मुंबईत आज लॉटरी सोडत, मंत्रालयातल्या लॉटरी केंद्राला उपमुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या गुढीपाडवा सोडतीच्या निमित्ताने मंत्रालयातल्या लॉटरी केंद्रावर स्वतः भेट देऊन लोकांनी राज्याची तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन केले. सदरप्रसंगी मंत्री महोदयांचे स्वागत महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केले.

‘राज्य लॉटरीची तिकीटांची विक्रमी खरेदी करून शासनाच्या विकासकामांना हातभार तसेच विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध होतो. देशभरातली एक पारदर्शक आणि प्रतिष्ठित लॉटरी म्हणूनही महाराष्ट्र राज्य लॉटरीची ओळख आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुढीपाडवा सोडतीला शुभेच्छाही व्यक्त केल्या. यावेळी लॉटरी विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर व पदाधिकारी राजेश बोरकर व कमलेश विश्वकर्मा हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे लॉटरी विभागाचे लेखा अधिकारी श्री. सुनिल लोटणकर उपस्थित होते.

भारताच्या हिरक महोत्सवी वर्षात आणि राज्य लॉटरी संचालनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा सोडत मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वा. वाशी, नवी मुंबई, उप संचालकांच्या कार्यालयात काढण्यात येणार असल्याची माहितीही लॉटरी विभागाने दिली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंग्रामनगर येथे साई प्राणप्रतिष्ठापनाचा वर्धापन दिन व श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा
Next articleराममंदिर बांधकामासाठी भाजपने गोळा केलेला निधी निवडणूक प्रचारासाठी तर वापरला नाही ना ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here