विजयराव माने यांना पंढरीनाथ काळे आणि अनिल शिर्के यांनी कार्यालयात शुभेच्छा दिल्या.
मुंबई ( बारामती झटका )
नवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक श्री विजयराव माने यांचा 26 जानेवारी वीस बावीस रोजी वाढदिवस कोरोना संसर्ग रोगाच्या साथीमुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांना पक्ष कार्यालयात पंढरीनाथ काळे आणि अनिल शिर्के यांनी वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सहकार्याने विजयराव माने यांनी नवी मुंबईमध्ये शिवसेना पक्षाचे काम चांगले केले होते त्यांना 2005 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती नगरसेवक पदावर काम करण्याची संधी जनतेने दिलेली होती. नगरसेवक पदावर चांगले काम केलेले होते तळागाळातील लोकांना न्याय दिलेला होता पक्षाची ध्येयधोरणे सर्व सामान्य जनते पर्यंत पोचवली होती त्यामुळे त्यांना 2011साली नवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख पदी काम करण्याची संधी मिळालेली होती मिळालेल्या संधीचे सोने करून विजयराव माने यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची अखंडपणे सेवा करण्याचे काम सुरू आहे 26 जानेवारी रोजी वाढदिवस त्यांना अनेक स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या पंढरीनाथ काळे व अनिल शिर्के यांनीही कार्यालयात जाऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng