उद्धवा अजब तुमचे सरकार… डोळे उघडा आणि सर्व सामान्य जनतेकडे बघा, अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ श्रीमती पार्वतीबाई भोसले यांच्यावर आली..
माळशिरस ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील वयोवृद्ध 90 वर्षीय श्रीमती पार्वतीबाई भोसले यांनी प्रशासनाच्या विरोधात अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आघाडी सरकार आहे. प्रशासनावर सरकारचा धाक व वचक नाही. बेधुंद व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे जाळे विणले आहे. त्यामुळे श्रीमती पार्वतीबाई भोसले यांच्यावर उद्धवा, अजब तुमचे सरकार… उघडा डोळे आणि बघा सर्वसामान्य जनतेकडे.. अशी खेदाने म्हणण्याची वेळ वयोवृद्ध पार्वतीबाई सावंत यांच्यावर आली आहे. महाराष्ट्र शासनाने खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी वाटप केल्या. त्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई यांना जमीन मिळालेली आहे. सदर जमिनीचे प्रांत कार्यालयाकडून भुमिअभिलेख कार्यालयाला पत्र पाठवून जमीन मोजून ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रांताधिकारी यांचे पत्र भूमी अभिलेख कार्यालयाने पत्रावळी समजली आणि केराच्या टोपलीत फेकून दिली असावी, अशी शंका श्रीमती पार्वतीबाई भोसले यांच्या मनामध्ये झालेली आहे. वय वाढलेले असल्याने काम धंदा करता येत नाही. शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याकरता अंगामध्ये त्राण राहिलेला नाही. काम धंदा होत नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे चार-पाच दिवसात प्रशासनाने त्यामध्ये तहसीलदार माळशिरस, प्रांताधिकारी अकलूज, उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय माळशिरस यांच्या शून्य नियोजन आणि ठिसाळ कारभाराविरोधात कार्यालयात जाणे शक्य नसल्याने घरांमध्येच उपाशी मरण्यापेक्षा अन्नत्याग आंदोलन करून मारण्याचा निर्णय श्रीमती पार्वतीबाई यांनी घेतलेला आहे. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी श्रीमती पार्वतीबाई भोसले यांना न्याय द्यावा, अशी नातेवाईकांची मागणी आहे.
श्रीमती पार्वतीबाई यांची हकीकत अशी आहे,
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शेत जमीन धारणाची कमाल मर्यादा अधिनियम 1975 तसेच वक्त कायद्यातील सुधारणा अधिनियम 2011 चे 28-1 अ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने दि. 2 फेब्रुवारी 2012 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करून मूळ खंडकरी अथवा त्यांचे वारस यांचेकडून अर्ज मागवून शासनाने खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी वाटप केलेल्या आहेत. त्यामध्ये अमृत नाटेकर समिती प्रमुख क्रमांक 1 तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मण भ़ोसले यांना सदाशिवनगर हद्दीतील गट क्रमांक 217 या गटातील 0.52 आर क्षेत्र दि. 06/01/2015 रोजी आदेश देऊन श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मण भोसले यांचे 7/12 वरती दप्तरी नोंद झालेली आहे. मात्र, सदर क्षेत्र त्यांना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून मोजणी होऊन हद्दी खुणा करून मिळण्यासाठी वयोवृद्ध महिलेने अनेक हेलपाटे मारले.
मात्र, भूमिअभिलेख कार्यालयाकडून डोळेझाक होत आहे. थकलेल्या वयोवृद्ध महिलेची आर्त हाक आहे, माझं डोळे झाकण्याआधी भूमी अधिकारी यांचे डोळे उघडावे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्राला उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून केराची टोपली मिळत आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष द्यावे अशी, विनंती वयोवृद्ध श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मण भोसले यांची जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला आहे.

श्रीमती पार्वती लक्ष्मण भोसले यांनी दि. 08/07/2021 रोजी प्रांत कार्यालय यांच्याकडे शेवटचा अर्ज केलेला आहे त्याप्रमाणे प्रांत कार्यालयाकडून तहसीलदार यांच्यामार्फत सर्कल व तलाठी यांचा अहवाल मागवून डॉ. हे शंविजय देशमुख उपविभागीय अधिकारी यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांना दि. 22/02/2022 रोजी पत्र देऊन आदेश दिलेला आहे.
सदर पत्रात श्रीमती पार्वती लक्ष्मण भोसले महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित सदाशिवनगर येथील गट नंबर 217 मधील जमिनच क्षेत्रातील मोजणी होऊन कब्जा मिळण्याबाबत विनंती केलेली आहे.
सदर प्रकरणी तहसीलदार माळशिरस यांचे मार्फत चौकशी करण्यात आली असून त्यांचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. मौजे सदाशिवनगर ता. माळशिरस गट नंबर 217 मध्ये पार्वतीबाई लक्ष्मण भोसले यांचे क्षेत्रात मारुती निवृत्ती सुळ हे अतिक्रमण करून पीक घेत असल्याचे नमूद केले आहे. तरी मौजे सदाशिवनगर येथील गट नंबर 217 क्षेत्र 22 हेक्टर 43 आर या संपूर्ण गटाची मोजणी हद्दी खुणा करून संबंधित खंडकरी शेतकऱ्यांना वारसदारांना वाटप केलेल्या क्षेत्राबाबत अतिक्रमित क्षेत्र काढून ताबा देणे आवश्यक आहे. तरी विषयांकित सदाशिवनगर येथील संपूर्ण गटाची मोजणी व हद्दी खुणा करून नकाशासह पूर्तता अहवाल या कार्यालयाकडे सादर करावा, असे पत्र देऊनसुद्धा उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्रांताधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दिलेली आहे.
श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मण भोसले यांची गरीब परिस्थिती आहे. त्यांना माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे वयोमानाने होत नाहीत. शरीर जीर्ण होत चाललेले आहे. अशा वयोवृद्ध महिलेची हेळसांड पुरोगामी महाराष्ट्रात होत असेल तर लोकप्रतिनिधींनी अशा मुर्दाड अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि वयोवृद्ध महिलेला न्याय मिळवून द्यावा अन्यथा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिलेला प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे शक्य नाही. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करावे लागेल, असे मत श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मण भोसले यांनी निराशाजनक व केविलवाणा चेहरा करून सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng