अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि ठाणे अंमलदार रमेश सूरवसे पाटील यांनी माणुसकी व कायदा यांचा समन्वय घडविला.
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज पाेलीस स्टेशन हद्दीतील माळखांबी येथील रंजना सरतापे हीला नव-याने दारू पिवून मारहाण करून हाकलून लावले हाेते. पंधरा दिवस वादावादी सूरू हाेती. साेबत दाेन
मूली हाेत्या, आई वडील वारलेले, अशा अवस्थेत अकलूज पाेलीस स्टेशनला आली. साेबत एक खंडागळे नावाचे सामाजीक कार्यकर्ते होते. पाेलीस केस घ्या, पण नांदायलाही जावू दया अशी कळकळीची विनंती केली.
पाेलिस ठाणे अमंलदार रमेश सूरवसे पाटील यांनी माणूसकी व कायदा याचा समन्वय साधून नव-याला बाेलून घेतले. नवरा बायकाेला घेवून जायला तयार हाेता परंतू, नवरा दारू पिऊन भांडेल आणि पून्हा मारेल या भितीने बायकाे जायला तयार हाेत नव्हती. अकलूज पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दाेन्ही पार्टीशी चर्चा करून तडजाेड घडवून तसे जबाब लिहून घेवून नवर्याला ताकीद देण्यात आली. तडजाेड घडवून आणल आणि संसार पून्हा जाेडून दिला.
संसार ताेडणं तसं… खूप साेपं आहे परंतू, जाेडणं खूप अवघड आहे. त्यासाठी याेग्य वेळ, याेग्य व्यक्ती व याेग्य ठिकाण मिळालं पाहीजे. आणि सूदैवानं ते मिळाले असंच काहीतरी म्हणावं लागेल. रंजना सरतापे हिला माहेर सारखाच अकलूज पोलीस स्टेशनचा आधार झालेला आहे. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अकलूज उपविभागीय अधिकारी पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर व पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून माणुसकीचे दर्शन घडवून काम करीत असल्याने पोलीस व सर्वसामान्य जनता त्यांच्यामधील समन्वय घडवणारा हा एक प्रसंग आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng