नागनाथ तोडकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त आ. बबनराव शिंदे यांच्याहस्ते सन्मान

कन्हेरगांव (बारामती झटका) धनंजय मोरे यांजकडून

अकोले खुर्द, ता. माढा येथील नागनाथ शिवाप्पा तोडकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्तच्या जाहीर कार्यक्रमात आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रविवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी साईराज मंगल कार्यालयात अकोले खुर्द येथील महाराष्ट्र विरशैव सभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष नागनाथ शिवाप्पा तोडकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांचा आ. शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माजी सभापती संजय पाटील, भिमानगरकर लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप भोसले, संचालक रंगनाथ शिंदे, विनोद पाटील, सरपंच कांतीलाल नवले, माजी सरपंच महादेव घाडगे, माजी संचालक संतोष पाटील, चेअरमन हरिदास पाटील, दिपक पाटील, महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल तोडकर, अविनाश भोसले, ॲड. रणजीत पाटील, संचालक रामकृष्ण काळे, अशोक पाटील, सचिन पाटील, आकाश पाटील, भारत खुपसे, उत्तरेश्वर तोडकर, गजानन तोडकर, सुनील तोडकर, टेंभुर्णी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय तोडकर, चेअरमन शिवाजी नवले, श्रीकांत रिसवडे, राजशेखर वनारोटे, शिवराज तोडकर, आदित्य तोडकर, माजी नगरसेवक चिदानंद वनारोटे, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकंना, लिंबनिप्पा मुदकंना, उदय तोडकर, मॅनेजर अनंत कंगले, मुकुंद आटकळे, संदीप मांजरे, ॲड. पी. एम. संचेती, पंडित पाटील, बबनराव भुजबळ, विक्रांत कारंडे, वैभव तळे, दादासाहेब पाटील, सचिन होदाडे, श्रीकांत लोंढे, दादासाहेब नवले, दिपक सर पाटील, उपसरपंच भाऊ महाडिक, मनोज चिंतामण, डॉ. वाघावकर, उपसरपंच विठ्ठल हांडे, नाना नवले, अर्चना वनारोटे, उज्वला रिसवडे, संगीता तोडकर, सारिका तोडकर, शुभांगी तोडकर, पूजा तोडकर, प्रीती तोडकर, पूर्वा तोडकर आदी उपस्थित होते.

या सत्कार समारंभाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ रणदिवे यांनी केले तर, आभार प्रदर्शन अनिल तोडकर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleठाणे महानगरपालिका तोंडावर, जितेंद्र आव्हाडांना शिंदे फडणविसांचा घेरण्याचा डाव…
Next articleमाळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव निवृत्तीराव गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here