नातेपुते आयसीयू अँड ड्रामा सेंटरचे भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते आमदार राम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. एम. के. इनामदार व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते ता. माळशिरस येथे नातेपुते आयसीयू अँड ड्रामा सेंटर चा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा गुरुवार दि. 01/09/2022 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते आहेत तर प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्यासह विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजी राजे उर्फ आबासाहेब देशमुख, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ अण्णा कवितके, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. डी. वाय. राऊत, नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अतुलबापू पाटील, नगरसेवक दादासाहेब उराडे, नगरसेवक अविनाश दोशी, नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, आरपीआयचे सचिव एन. के. साळवे यांच्यासह नगरपंचायत नगरसेवक व नगरसेविका, मेडिकल असोसिएशन नातेपुते अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, पॅरामेडिकल स्टाफ, व्हीजिटिंग फिजिशियन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी सर्वांनी नातेपुते आयसीयु अँड ड्रामा सेंटर, पुणे-पंढरपूर रोड, नंदिनी हॉस्पिटल समोर, नातेपुते, ता. माळशिरस येथे उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. एम. पी. मोरे, डॉ. सी. आर. व्होरा, डॉ. टी. एन. चंकेश्वरा, डॉ. एस. एम. भोसले यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी युवा उद्योजक दिनेश धाईंजे यांचा सन्मान केला.
Next articleगाथामूर्ती ह.भ.प. श्री. रामभाऊ महाराज राऊत यांचे मळोली ता. माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here