नातेपुते ग्रामपंचायतच्या अखेरच्या सरपंच सौ. कांचनताई लांडगे तर, नगरपंचायतचा प्रथम नगराध्यक्ष कोण ?

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाच्या असणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. कांचनताई दादासो लांडगे अखेरच्‍या सरपंच ठरलेल्या आहेत. त्यांच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा फैसला मुंबई येथे मंत्रालयात चार वाजता आरक्षण सोडत होणार आहे. पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान कोणाला मिळतो, याकडे नातेपुतेकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नातेपुते ग्रामपंचायत असताना जनशक्ती आघाडीने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठनेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व 17 जागा जिंकून दैदिप्यमान विजय मिळविला होता. सरपंचपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असल्याने तत्कालीन सरपंचपदी सौ. कांचनताई दादासो लांडगे यांची बिनविरोध निवड झालेली होती. सध्या नगरपंचायतमध्ये जनशक्ती आघाडीचे अकरा नगरसेवक आहेत, नागरी आघाडीचे पाच नगरसेवक, तर एक अपक्ष आहे. आज सोडत झाल्यानंतर नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला की पुरुष व अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर महिला की पुरुष आज फैसला होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आरक्षण सोडत नातेपुतेकरांच्या मनातील प्रथम नगराध्यक्ष होणार हे मात्र निश्चित आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते नगरपंचायतमध्ये काय चाललंय ? हे पाहायलासुद्धा राष्ट्रवादीच्या विचाराचा नगरसेवक नाही. राष्ट्रवादीचे दुर्दैव…
Next articleराष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ शेवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here