नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत जनशक्ती विकास पॅनलने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, यांच्या मार्गदर्शनाखाली 11 नगरसेवक निवडून आलेले होते. नगराध्यक्ष निवडीच्या 14 फेब्रुवारी 20 21 रोजी नगराध्यक्षपदासाठी सौ उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांचा एकमेव अर्ज आलेला होता त्यामुळे नगराध्यक्ष पद बिनविरोध होणार होते.
18 फेब्रुवारी 20 21 रोजी नातेपुते नगरपंचायत कार्यालयामध्ये पीठासन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीची बैठक बोलावलेली होती . नगराध्यक्षपदासाठी सौ उत्कर्षा राणी पलंगे यांची घोषणा केली.
उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू झाली 12 ते 2 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती यामध्ये मालोजीराजे तथा आबासाहेब शहाजीराव देशमुख यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्ष पदासाठी आलेला होता. उमेदवारी अर्ज वेळेनंतर उपनगराध्यक्ष आबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नातेपुते नगरपंचायतीच्या बिनविरोध नगराध्यक्षपदी सौ उत्कर्षराणी पलंगे व उपनगराध्यक्षपदी श्री मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
नातेपुते ग्रामपंचायत असताना अखेरचे सरपंच सौ कांचनताई लांडगे व उपसरपंच श्री अतुल बापू पाटील यांना बहुमान मिळाला. नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदा नगराध्यक्ष सौ उत्कर्षारानी पलंगे व उपनगराध्यक्ष आबासाहेब देशमुख यांना बहुमान मिळालेला आहे. नगरपंचायत मधील सर्वच्या सर्व 17 नगरसेवक यांनी एकमेकांवर विश्वास ठेवून नातेपुते गावच्या विकासासाठी एक असल्याचे निवडणुकीवरून चित्र स्पष्ट झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng