नातेपुते नगरपंचायतमध्ये कृष्णा, भिमा, निरा, राजकीय प्रवाह एकत्र आल्याने विकासाची गंगा वाहणार.

नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडी प्रसंगी देशमुख, पाटील, राऊत तिन्ही गट एकत्र येऊन बिनविरोध सत्ता स्थापन.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते ता. माळशिरस येथील नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड करीत असताना देशमुख, पाटील, राऊत तिन्ही राजकीय गट एकत्र येऊन नगराध्यक्ष सौ. उत्कर्षाराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या बिनविरोध निवडी केलेल्या असल्याने नातेपुतेच्या राजकीय इतिहासामध्ये राजकारणाला सकारात्मक वळण लागणार आहे. राजकारणातील कृष्णा, भीमा, निरा तीन राजकीय प्रवाह एकत्र आल्याने नातेपुते नगरीत विकासाची गंगा वाहणार असल्याने नातेपुते पंचक्रोशीतील जनतेमध्ये एकत्रित येऊन बिनविरोध निवडी केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

नातेपुते नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत जनशक्ती विकास पॅनलने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नातेपुते नगरीचे ज्येष्ठनेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 नगरसेवक निवडून आलेले होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व नातेपुते नगरीचे माजी सरपंच भानुदास राऊत, ज्येष्ठनेते दादासाहेब उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी आघाडी पॅनलचे सहा नगरसेवक निवडून आलेले होते, तर एक अपक्ष नगरसेवक असे सतरा नगरसेवक निवडून आलेले होते.

नगराध्यक्ष निवडीच्या दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी नगराध्यक्षपदासाठी सौ‌ उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांचा एकमेव अर्ज आलेला होता. दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी नगराध्यक्षपदाची बिनविरोध घोषणा करण्यात आली. उपनगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख त्यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाला. उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज पीठासन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण कारंडे यांच्याकडे दाखल करीत असताना माजी सरपंच भानुदास राऊत, ज्येष्ठ नेते दादासाहेब उराडे, माजी उपसरपंच अतुलबापू पाटील यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. नातेपुते नगरपंचायत सत्तास्थापनेच्या वेळेस नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी बिनविरोध करून देशमुख, पाटील व राऊत तिन्ही गटांनी सकारात्मक राजकारणाचा नवा फॉर्म्युला अस्तित्वात आणलेला आहे. यामुळे गावच्या अडीअडचणी सोडवून विकास होवून गावाचा चेहरामोहरा बदलून जाईल.
नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख यांना नगरपंचायतीचा कारभार करीत असताना सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर प्रत्यक्ष काम करीत असताना नगरपंचायतमधील बुजुर्ग अनुभवी असणारे भानुदास राऊत, दादासाहेब उराडे, अतुलबापू पाटील यांचा प्रशासन चालविण्याचा अनुभव असल्याने यांच्यासह सर्वच नगरसेवकांची साथ मिळणार असल्याने नातेपुते मधील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सुटल्या जाणार आहेत.

नातेपुते नगरपंचायतीमध्ये राजकीय गटतट, मतभेद, पक्षभेद बाजूला सारून एकत्रित येऊन सत्ता स्थापन केल्याने महाराष्ट्रात नातेपुते नगरपंचायत विकासाचे मॉडेल बनेल यात नातेपुतेकरांना शंका नाही. पाटील, देशमुख, राऊत तिन्ही गटांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून सर्वसामान्य जनता व मतदार समाधानी आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोहिते पाटील परिवारातील माजी सरपंच शिवतेजसिंह जनतेच्या मनातील विकासप्रिय सर्वमान्य युवा नेतृत्व.
Next article“आता माझी सटकली…” म्हणण्याची वेळ विद्यमान सरपंचावर आली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here