नातेपुते नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक ॲड. रावसाहेब पांढरे यांचा भाजपच्या वतीने सन्मान संपन्न.

नातेपते ( बारामती झटका )

नातेपुते नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवकपदी ॲड. रावसाहेब पांढरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, फोंडशिरसचे युवा नेते दादासाहेब पाटील, पिरळे गावचे शिवाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते‌. नूतन नगरसेवक ॲड. रावसाहेब पांढरे व नातेपुते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन अजेश पांढरे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

नातेपुते नगरपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य नगरसेवक पद रिक्त होते. या रिक्त जागी नातेपुते नगरीचे माजी सरपंच ॲड. रावसाहेब पांढरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याने त्यांची विरोध नगरसेवक पदी बिनविरोध करण्यात आली होती.

ॲड. रावसाहेब पांढरे नातेपुते पंचक्रोशीमध्ये सर्व परिचित राजकारणामधील धुरंधर व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील भीमराव पांढरे यांनी उपसरपंच पदाची धुरा सांभाळली होती. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक कोट्यातील नगरसेवक पदी काम करण्याची संधी मिळालेली आहे. नातेपुते सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा सांभाळलेली असल्याने दांडगा राजकीय अनुभव आहे. भविष्यात ॲड. रावसाहेब पांढरे यांच्या निवडीने भारतीय जनता पार्टीला निश्चितच फायदा होऊ शकतो.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकेतकी चितळे विरुद्ध पैठण पोलीस स्टेशनला राजू पाटील बोंबले यांची तक्रार
Next articleछत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here