नातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्रात “पुन्हा देवेंद्र” या फलकाने लक्ष वेधून घेतले…

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मतदार संघातील नातेपुते नगरपंचायतीचे भाजपचे निष्ठावान नगरसेवक दादासाहेब उराडे यांच्या फलकाची जोरदार चर्चा सुरू…

नातेपुते ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मतदार संघात नातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र या फलकाने लक्ष वेधून घेतलेले आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मतदार संघात महाराष्ट्रात पहिल्यांदा नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक व भाजपचे निष्ठावान राम सातपुते यांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ नेते राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे यांच्या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रामध्ये सलग पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहण्याचा बहुमान तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांना मिळालेला होता. त्यांनी पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शेतकरी युवक वर्ग उद्योग-व्यापार यांच्यासाठी सक्षम कार्य करून महाराष्ट्राच्या आजपर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यापैकी दैदिप्यमान कामगिरी करणारे एकमेव मुख्यमंत्री ठरलेले होते. पदाचा कार्यकाल संपत असताना शेवटच्या अधिवेशनामध्ये भाषण करताना मी पुन्हा येईन असे ठणकावून सांगितले होते. जनतेने सुद्धा भारतीय जनता पक्षाला १०६ आमदार देऊन कौल दिलेला होता. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करून महविकास आघाडी सरकार अल्पमतात आणलेले आहे. सध्या महाराष्ट्रात सत्ता बदलाचे वारे सुरू आहे. सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावे, अशी इच्छा आहे. त्याचाच प्रत्यय माळशिरस विधानसभा मतदार संघात नातेपुते नगरपंचायतमधील आमदार राम सातपुते यांचे कट्टर समर्थक भाजपचे ज्येष्ठ नेते नगरसेवक राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे यांनी पुन्हा देवेंद्र असा फलक लावला असल्याने नातेपुते पंचक्रोशीसह पुणे पंढरपूर रोडवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. तर दुसरीकडे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून मुंबई येथे तळ ठोकून आहेत. त्यामुळे नगरसेवक दादासाहेब उराडे यांच्या या फलकाला विशेष महत्त्व आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजनसामान्यांच्या संघर्षासाठी उभे राहणारे झुंजार नेतृत्व म्हणजे लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील
Next articleमहाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमुळे माळशिरस तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा दौरा रद्द – संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here