नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायत रूपांतर करण्यासाठी नागरिकांनी अर्धशतकाच्या वर आंदोलन केले होते.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर पंचायती मध्ये रूपांतर होण्याकरता लाक्षणिक धरणे आंदोलन अर्धशतकाच्या वर दिवस आंदोलन केलेले होते नगरपंचायत झाल्यानंतर निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज भरण्यामध्ये थोडक्यात शतक हूकलेले आहे.
नातेपुते नगरपंचायत मध्ये 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली होती. 17 जागांसाठी उमेदवारांनी 98 अर्ज भरलेले आहेत त्यापैकी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या आदेश दिलेले होते त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने अध्यादेश काढून ओबीसी वार्डातील निवडणूका स्थगित केलेल्या आहेत नातेपुते नगरपंचायत मध्ये चार वार्डात दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते त्यामुळे एकूण 98 पैकी ओबीसी चे 10 कमी झाल्यास 88 उमेदवार यांनी 13 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत उद्या छाननी आहे. नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर काम पाहत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng