जनशक्ती विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक ४ च्या उमेदवार सौ. भारती बापूराव पांढरे यांचा होम टू होम प्रचार सुरू.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२१ च्या निवडणुकीत माळशिरस नागरी आघाडी पुरस्कृत जनशक्ती विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक चार मधील अधिकृत उमेदवार सौ. भारती बापूराव पांढरे यांनी वार्डातील होम टू होम प्रचारास सुरुवात केलेली आहे. जनशक्ती विकास आघाडीच्या रणरागिनी यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे.
जनशक्ती विकास आघाडीचे सर्वेसर्वा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ समाजरत्न राजेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते रघुनाथ कवितके व अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. आणि उमेदवारांनी आपापल्या वार्डमध्ये धुमधडाक्यात प्रचारास सुरुवात केलेली आहे. प्रभाग क्रमांक चारमधील सौ. भारती बापूराव पांढरे यांनी प्रचारामध्ये सर्व महिलांच्या समवेत होम टू होम प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. मतदारांना मत पत्रिकेचा डेमो दाखवून मतदान कसे करावयाचे याचेही प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे अशिक्षित मतदारांना मतदान करताना अडचण येत नाही.

नातेपुते नगरपंचायत होण्याअगोदर ग्रामपंचायत निवडणुकीत सौ. भारती बापूराव पांढरे यांनी सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य निवडून येण्यामध्ये रेकॉर्डब्रेक केलेले होते. मतदान झालेल्यापैकी ८० टक्के मतदान घेऊन विजयी झालेल्या होत्या. त्यांनी १२७६ मताधिक्क्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे पराभव डिपॉझिट जप्त केले होते. सौ. भारती पांढरे या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव ऊर्फ मामासाहेब पांढरे यांच्या धर्मपत्नी आहेत. नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये ५३० मतदार आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून छताचा पंखा चिन्हा समोरील बटन दाबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जनशक्ती विकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते तसेच मामाश्री प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सर्वच उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना छताचा पंखा चिन्हाने वार्डातील वातावरण शांत ठेवलेले आहे. त्यामुळे सौ. भारती पांढरे यांच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng