नातेपुते नगरीमध्ये आरोग्य मंत्री ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे जंगी स्वागत.

नातेपुते ( बारामती झटका )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमधील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत प्रथमच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले होते. नातेपुते नगरपंचायत हद्दीत त्यांचे जंगी स्वागत नातेपुतेकरांच्यावतीने करण्यात आले. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, नातेपुते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रणधीर देशमुख, उद्योजक अतुल शेठ बावकर यांनी नामदार तानाजीराव सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यासह नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक, पदाधिकारी, नातेपुते पंचक्रोशीतील आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध गावचे आजी-माजी सरपंच, विविध संस्थांचे चेअरमन, समाजातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. प्रा. तानाजी सावंत हे नातेपुते ग्रामीण रुग्णालयाला सदिच्छा भेट देण्याकरता आलेले होते. त्यावेळेस नातेपुतेकरांच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथे कट्टर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत गेलेल्या मार्गाचे शुद्धीकरण केले.
Next articleविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भुताष्टे पंचक्रोशीतील सभासदांना घरपोच साखर वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here