नातेपुते परिसरात कृषी विभागाच्या कारवाईमध्ये बडा मासा गळाला लागण्याची शक्यता…

बाळासाहेब शिंदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्या पथकाची दमदार धडाकेबाज कामगिरी केली.

धनदांडगे कृषी दुकानदार व व्यापारी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे औषधे मारून टाळु वरचे लोणी खात आहेत.

नातेपुते ( बारामती झटका )

यंदाचा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याबाबत सर्वसामान्य शेतकरी आनंदात आहेत मात्र, धनदांडगे कृषी दुकानदार व व्यापारी शेतकऱ्यांच्या बोगस, बियाणे, खते, औषधे, कीटक नाशके माथी मारून शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे दुकानदार आहेत. यांच्यावर करडी नजर ठेवून त्यांचे लक्ष आहे. गुरुवार दि. 12/5/2020 रोजी नातेपुते परिसरातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन तास दुकानाची चौकशी करून अनेक नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवणार आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या कारवाईत बडा मासा गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माळशिरस तालुक्यात अकलूज, वेळापूर, माळशिरस, पिलीव, श्रीपुर महाळुंग, नातेपुते अशा मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावामध्ये आजूबाजूचे शेतकरी खते, बी-बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी येत असतात‌ अशावेळी धनदांडगे कृषी दुकानदार व व्यापारी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या माथी बोगस मालाची विक्री करून शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी नेहमी खात असतात.

नातेपुते परिसरात नेहमीच शेतकऱ्यांना फसवणूक करणारे धनदांडगे व्यापारी आहेत. आज सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, यांच्या भरारी पथकाने नातेपुते येथील तीन तास दुकानाची तपासणी करून अनेक नमुने काढलेले आहेत. भरारी पथकामध्ये एस. व्ही. तळेकर उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर, पी. एस. गायकवाड प्रभारी माळशिरस तालुका अधिकारी, नितीन चव्हाण माळशिरस पंचायत समिती कृषी अधिकारी, सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी नातेपुते व नातेपुते मंडळमधील कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकारी भरारी पथकामध्ये सामील झालेले होते.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी हंगामाच्या सुरुवातीस बोगस खते, बियाणे, विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाईला सुरुवात केलेली असल्याने शेतकऱ्यांमधून आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा दुकानदारावर कठोरात कठोर कारवाई करून परवाना कायमचा रद्द करून कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीने जोर धरलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस पंचायत समितीमधील दोन ग्रामविकास अधिकारी व आठ ग्रामसेवक यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत
Next articleसर्वसामान्य कुटुंबाच्या दुःखात उत्तमराव जानकर यांची सांत्वनपर भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here