नातेपुते पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

मोटर सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करून ९ मोटर सायकली केल्या जप्त

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटर सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून ६,२५,०००/- रु. किमतीच्या एकूण ९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नातेपुते पोलीस ठाणे गुरनं ७३/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दि. ०२/०३/२०२२ रोजी दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास कामी डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग, अकलूज व नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करत असताना त्यांना नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे मांडवे गावातील पुणे-पंढरपूर रोडवर अहिल्याचौक येथे दोन मुले संशयितरित्या बुलेट मोटर सायकलवर फिरत आहेत. अशी बातमी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तानाजी पवार पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकास मिळाली. त्यांनी या दोन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर हा गुन्हा केला असल्याचे व इतर मोटरसायकली एक साथीदार एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्या मदतीने चोरले असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास कामी आदित्य रामभाऊ सकट वय २१ वर्ष, काशिलिंग उर्फ काशिनाथ दत्तात्रय लोखंडे वय १९ वर्षे, दोघे रा. विजयवाडी ता. माळशिरस यांना अटक करून व एक विधिसंघर्षग्रस्त बालक याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर त्यांनी सदर गुन्ह्यातील १ मोटर सायकल, २ बुलेट, १ पॅशन, २ स्प्लेंडर, १ ड्रीम युगा, १ प्लॅटिना, १ एचएफ डीलक्स अशा एकूण ६,२५,०००/- रुपयांच्या नऊ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलिस अधिकारी, अकलूज विभाग, अकलूज व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर तानाजी पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रणनवरे, पोलीस नाईक नवनाथ माने, पोलीस नाईक मसाजी थोरात, पोलीस नाईक महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मन्सूर नदाफ, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र सदगर, पोलीस कॉन्स्टेबल अजित कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कापसे यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल रणनवरे व पोलीस नाईक नवनाथ माने हे करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसमधील सार्वजनिक आरोग्य व गृह विभागाच्या मागण्यांसाठी आमदार राम सातपुते यांनी सभागृहात वेधले लक्ष
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनीषा आप्पासाहेब कर्चे पंचायत समितीसाठी प्रबळ दावेदार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here