नातेपुते पोलीस स्टेशन जुगाराच्या अड्याचे कितीतरी तालुके व गावांचे केंद्रबिंदू बनले

नातेपुते नगरीची उद्योग व्यवसायामध्ये महाराष्ट्रात ओळख, अशा नगरीची अवैध व्यवसायिकांनी अवैधधंद्याची राजधानीकडे वाटचाल सुरू केली…

अवैध व्यवसायाला आळा घालण्याकरता पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी अवैध व्यवसायिकांचे स्टिंग ऑपरेशन करणे गरजेचेच असल्याचे त्रस्त नागरिक व महिला भगिनींची अपेक्षा

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत मटका, गुटखा, दारू व्यवसाय, वाळू तस्करी असे अनेक अवैद्य धंदे राजरसपणे सुरू असून नातेपुते पोलीस स्टेशन जुगार अड्ड्याचे कितीतरी तालुके व गावांचे केंद्रबिंदू बनलेले आहे. नातेपुते नगरीची उद्योग व्यवसायामध्ये महाराष्ट्रात ओळख आहे. अशा नगरीची अवैध व्यावसायिकांनी अवैधधंद्याची राजधानीकडे वाटचाल सुरू केलेली आहे.

माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. सध्या कार्यरत असणारे पोलीस उपधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे यांनी अवैध व्यावसायिकांचे स्टिंग ऑपरेशन करणे गरजेचे असल्याचे त्रस्त नागरिक व महिला भगिनींची मागणी आहे.

नातेपुते शहरात पाच ते सहा मटका बुकी घेणारे मालक आहेत, गुटख्याचे मोठे दोन डीलर आहेत, अनेक तालुक्यांमध्ये नातेपुते येथून गुटखा वितरित केला जातो‌ आठ ते दहा ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. जुगार खेळण्याकरिता बारामती, फलटण, दहिवडी, सांगोला, इंदापूर, दौंड, पंढरपूर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली अशा ठिकाणाहून बडे लोक येत असतात‌. तर माळशिरस तालुक्यातील अनेक खेड्यातील लोक दररोज लाखो रुपयाचा जुगारावर चुराडा करीत आहेत. नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील ठराविक दोन-तीन ओढा, नाले नसलेली गावे सोडली तर सर्रास अवैध वाळू वाहतूक नातेपुते पोलीस स्टेशनच्या सहकार्याने राजरोसपणे सुरू आहे. कितीतरी गावात चौकातचौकात अवैध व्यावसायिकांनी आपली बेकायदेशीर दारूची दुकाने थाटलेली आहेत‌. नातेपुते पोलीस स्टेशन अवैध व्यावसायिकांचे आगार बनलेले आहे‌.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढलेले आहे. अद्यापपर्यंत नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा माळशिरस तालुका दौरा झालेला नाही. सातपुते मॅडम यांनी भरारी पथके नेमलेली होती. त्याही पथकांची कार्यवाही मंदावलेली आहे. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी आहेत.

सध्या पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांची नेमणूक आहे. त्यांनी नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शासकीय गाडी न वापरता साध्या वेशामध्ये स्वतः व अन्य पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी यांना फेरफटका मारून अवैध व्यावसायिकांच्या मुस्क्या आवळून आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कडक कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा, अशी त्रस्त नागरिक व महिला भगिनी यांची मागणी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleA Companion If you mclaurin village need to Nordic Theatre
Next articleआई महोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक वर्तुळात समृद्ध भर घालणारा ठरेल – चंद्रकांतदादा पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here