नातेपुते ( बारामती झटका )
ज्वारी पीक प्रकल्प व प्रकल्पाअंतर्गत विस्तार कार्यक्रमाची धूमधडाक्यात सुरुवात महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालय अधिनस्त मौजे लोणंद फडतरी लोढे मोहिते वाडी ‘ धर्मपरी कोथळे या गावात आधीक क्षेत्र असल्यामुळे या गावांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक धान्य विकास कार्यक्रम अंतर्गत वरील गावामध्ये १२ प्रकल्प अंतर्गत २५० शेतकरी निवड करून करण्यात आला होता . कार्यक्रमाअतर्गत वरील गावात प्रकल्पअंतर्गत निवड लामार्थीचे लागवड व लागवड पूर्व प्रशिक्षणा मध्ये माती परिक्षण करून घेणे व त्यावर आधारीत खत व्यवस्थापन बाबत श्री विजय कर्णे कृषिसहायक यांनी महिती दिली . ज्वारी बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व महिती श्री गोरख पांढरे कृषि पर्यवेक्षक यांनी महिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले श्री सतिश कचरे मंडल कृषि अधिकारी यांनी ज्वारी पीक लागवड तंत्र व मंत्र व मुलस्थानी जलसंधारण बाबत माहीती दिली. श्री नवनाथ गोरे कृस यांनी ज्वारी पीक विमा बाबत लामार्थीशी चर्चा केली. श्री सचिन दिडके कृ.स यांनी ज्वारी पीक पाणी व्यवस्थापन व संरक्षीत पाणी बाबत लामार्थीना मार्गदर्शन केले . श्री लालासाहेब माने कृस यांनी एकात्मिक खत व डी.ए.पी फवारणी अन्न द्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रम माहीती मार्गदर्शन व्याख्यान चर्चा व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या गावात मोहीम स्वरुपात राबविण्यात आला . या कार्यक्रमास गावातील निवड केलेले लामार्थी ‘ इतर शेतकरी .संरपंच ‘ सदस्य ‘ग्रामसेवक ‘ पंचायत समिती सदस्य ‘ प्रगतशील शेतकरी यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमात बियाणे वाटप व बीज प्रक्रिया निवीष्ठा चे वाटप संबंधीत शेतकरी यांना मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीउदय साळूंखे कृप यांनी केली व श्री दातात्रय पांढरमिसे यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितीत सर्व लामार्थीना चहापान करून कार्यक्रमांची सांगता झाली .
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng