झी टॉकीज फेम सुप्रसिद्ध एकपात्री अभिनय करणारे दीपक देशपांडे यांना प्रत्यक्ष पाहण्याची जननायक मामासाहेब पांढरे व उद्योजक अतुल शेठ बावकर यांनी नातेपुतेकरांना दिली सुवर्णसंधी
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते येथील अतुल उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुभाषतात्या शंकर बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाज प्रबोधन उपक्रमाचे आयोजन जननायक मामासाहेब पांढरे, उद्योजक अतुलशेठ सुभाष बावकर, सत्यवानशेठ सुभाष बावकर यांनी केलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत उद्योग व्यवसाय करून देवांग कोष्टी समाजामध्ये आदर्श व्यक्तिमत्व असणारे सुभाषतात्या बावकर यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि. 21/09/2022 रोजी होणार आहे. त्यानिमित्त दोन दिवस समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

मंगळवार दि. 20/09/2022 रोजी सायंकाळी 04 ते 05 या वेळेत झी टॉकीज फेम सोलापूर येथील सुप्रसिद्ध एकपात्री कार्यक्रम करणारे दीपक देशपांडे यांचा कार्यक्रम व सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन 05 ते 07 या वेळेमध्ये डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला, नातेपुते येथे दोन्ही कार्यक्रम संपन्न होणार आहेत. बुधवार दि. 21/09/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. निलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. पुष्पवृष्टी आरती व महाप्रसादाचे आयोजन कोष्टी गल्ली, शिव सद्गुरु चौक, नातेपुते येथे केलेले आहे.

तरी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे उद्योजक अतुलशेठ बावकर व सत्यवान शेठ बावकर आणि समस्त बावकर परिवार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
