नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते, ता. माळशिरस संचलित डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला, नातेपुते येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे. संस्थेचे चेअरमन शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, संस्थेचे सचिव विरेंद्र दावडा, डॉ. बाळकृष्ण दाते प्रशालेचे सभापती मामासाहेब पांढरे, मुख्याध्यापक प्रवीण बडवे, उपमुख्याध्यापक पिसे सर, पर्यवेक्षक कांबळे सर, खडतरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय पवार सर, विभाग प्रमुख विकास काळे सर, सौ. योगिता कथले मॅडम आदींनी शिष्यवृत्तीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे अभिनंदन केले आहे.
नातेपुते एज्युकेशन सोसायटी, नातेपुते संचलित डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला, नातेपुते इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी 1) पवार अंशू संतोष, 2) भांबुरे श्रेयशी राजेश, 3) बिडवे समर्थ रोहन, 4) पाटील सार्थक दुर्योधन, 5) कुलकर्णी वेदांत प्रसाद, 6) वाघमारे ऋषिकेश विनायक, 7) मोरे ओंकार सतीश, 8) जाधव अनुष्का आनंदराव तसेच इयत्ता आठवीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी 1) साक्षी सुधिर गोरे, 2) मृण्मयी आनंदकुमार लोंढे, 3) श्रावणी तुकाराम भोमाळे, 4) उन्नती सचिन बोराटे, 5) जानवी लालासाहेब राऊत, 6) आकांक्षा भाऊ रुपनवर त्याचबरोबर NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी 1) ढोपे तेजश्री प्रकाश या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षक, संस्थेचे चेअरमन शहाजीराव मुधोजीराव देशमुख उर्फ दादासाहेब यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng