नातेपुते येथील त्रिमूर्ती बंधूंनी जपली सामाजिक बांधिलकी, स्वखर्चाने केला रस्ता…

नातेपुते (बारामती झटका)

पुणे-पंढरपूर रोडवरील शेरेवाडी कॅनॉल या ठिकाणी कॅनॉलच्या साईट पट्टीवरून शेरेवाडी, बोराटे वस्ती, जाधव वस्ती, कदम वस्ती, खांडेकर वस्ती या वस्त्यांवर ये-जा करण्याकरता या रस्त्याचा दैनंदिन वापर केला जातो. शालेय विद्यार्थी, दूध व्यवसायिक, ऊस वाहतूकदार, शेतकरी बांधव यांना उपयोगी व जवळचा असणारा म्हणून या रस्त्याकडे पहिले जाते. सदरचा रस्ता अवकाळी पावसाने खराब झाल्याने माणसांना वाहनाने तर नाहीच नाही, परंतु चालत सुद्धा जाता येत नव्हते. संपूर्ण रस्ता चिखलमय झालेला होता.

सामाजिक बांधिलकी म्हणून राजाराम पेट्रोलियम यांच्यावतीने सदरचा रस्ता स्वखर्चाने मुरूम टाकून ट्रॅक्टर, जेसीबी व डम्पिंग ट्रॅक्टर चा वापर करून लोकांच्या येण्या जाण्याकरता तयार केलेला आहे. वास्तविक पाहता सामाजिक बांधिलकी जपणे एवढेच मगर पाटील परिवाराने केले आहे. लोकांची अडचण होऊ नये हा उदात्त हेतू ठेवून त्यांनी स्वखर्चाने रस्ता केलेला आहे. रस्ता येण्या-जाण्याकरता चांगला झालेला असल्याने या रस्त्यावरील सर्व वाहनधारक व येणा-जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, दूध व्यवसाय, ऊस वाहतूकदार, यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

राजाराम मगर पेट्रोलियम यांच्यावतीने स्वखर्चाने पुणे-पंढरपूर रोडवरील शेरेवाडी कॅनॉलची साईडपट्टी दुरुस्त, मगर पाटील यांचे त्रिमूर्ती असणारे बाळासाहेब, लक्ष्मण आणि आबासाहेब यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सदरचा रस्ता करण्याकरता प्रगतशील बागायतदार बाळासाहेब राजाराम मगर पाटील, लक्ष्‍मण राजाराम मगर पाटील, आबासाहेब राजाराम मगर पाटील या त्रिमूर्तींनी सामाजिक बांधिलकी जपत रस्त्याचे काम स्वखर्चाने केलेले आहे. सदरच्या रस्त्यावर माती लेवल करण्याचे काम आदिनाथ जराट पिंपरी, जेसीबी दादासाहेब कर्चे, डम्पिंग ट्रॅक्टर सुरज मुलाणी नातेपुते आदी वाहन चालकांनी उत्कृष्ट व दर्जेदार रस्ता बनवण्याची तसदी घेतलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाझी वसुंधरा अभियान पुणे विभागाची दमदार कामगिरी, विशेष लेख
Next articleनातेपुते नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यात थोडक्यात शतक हुकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here