नातेपुते येथील दाते प्रशालेचे सन 1967-68 सालीचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे दाते प्रशाला नातेपुते या प्रशालेचे सन 1967-68 सालचे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नातेपुते येथील कवितके सांस्कृतिक भवन, खंडोबा मंदिराजवळ, मेन पेठ येथे शनिवार दि. 16 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व माजी विद्यार्थी पती-पत्नी सह उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली.


सदर कार्यक्रमामध्ये डॉ. एम. के. इनामदार व ज्येष्ठ नेते हनुमंत धालपे यांचा वाढदिवस उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र परिवार यांनी साजरा केला. माजी विद्यार्थी गेट-टुगेदर कार्यक्रमाचे चौथे वर्ष आहे. दरवर्षी सर्व विद्यार्थी एक दिवस एकत्र येत असतात. विशेष म्हणजे सपत्नीक उपस्थित राहत असतात. अनेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होत असते. उतरत्या वयामध्ये मित्रांचा एकमेकांना सल्ला व आधाराची गरज असते. अशा पद्धतीने स्तुत्य उपक्रम माजी विद्यार्थी राबवत आहेत.

सदर कार्यक्रमासाठी रमेश दत्तात्रय लंके, सिमंदर जीवन दावडा, वज्रकुमार भाईचंद चंकेश्वर, सुरेश उद्धव वहीकर, हनुमंत बाबुराव झगडे, सुरेश शिवदास तांबडे, पोपट नारायण साळवे, प्रभाकर बजरंग पद्मन, हनुमंत गोविंद धालपे, दिगंबर बापूराव लाळगे, आनंदा तुकाराम सोनवळ, भानुदास गोविंद थिटे, जगन्नाथ गुलाबराव डोईफोडे, सुकुमार फुलचंद गांधी, रघुनाथ मस्कू ठोंबरे, देनाजीराव धोंडीबा काळे, कोंडीबा नाना वाघमोडे पाटील, पांडुरंग नामदेव बरडकर, विलास नेमचंद दोशी, लतीब बबनभाई नदाफ, विठ्ठल तात्याबा रुपनवर, शितल रायचंद दोशी, वसंत सिताराम सरक, बाहुबली शिवलाल चंकेश्वरा, भानुदास एकनाथ पवार, अजितकुमार जयकुमार शहा, गोकुळदास अण्णा भरते, डॉ. एम. के. इनामदार, धोंडीराम रामदास कोल्हाळे, वज्रकुमार शिवलाल चंकेश्वरा, गणपत शंकर बोडरे गुरुजी, रुक्मिणी शंकर सूर्यवंशी, तुकाराम रामचंद्र कणसे, पांडूरंग नारायण मोरे, सुधिर वासुदेव कुलकर्णी, अनंतलाल रतनचंद दोशी, प्रकाश बापूराव पवार, आजी-माजी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. दिवसभर उत्साहपूर्ण वातावरणात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
