नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुतेचे चेअरमन शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, सचिव वीरेंद्रशेठ दावडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बा.ज. दाते व नातेपुते कनिष्ठ महाविद्यालय नातेपुते प्रशाला समितीच्या सभापतीपदी मामासाहेब पांढरे यांची निवड झालेली आहे. सदर निवडीचे पत्र मुख्याध्यापक प्रवीण बडवे, उपमुख्याध्यापक विठ्ठल पिसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय पवार, ऑफिस सुपरिटेंडेंट आबासाहेब देवकाते, माळशिरस पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, रणजीतदादा काळे, वस्ताद देवाण्णा काळे, मोहित जाधव, धनाजी पांढरे, तेजस पाटील, सचिन ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, सचिव वीरेंद्र शेठ दावडा संचालक ॲड. शिवाजीराव पिसाळ यांच्यासह संचालक मंडळांमध्ये एकमताने सभापतीपदी मामासाहेब पांढरे यांची निवड करण्यात आलेली आहे. मामासाहेब पांढरे यांचेकडे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद आहेच, पण आता त्यांच्याकडे दाते प्रशाला समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी दिलेली असल्याने मामासाहेब पांढरे समर्थकामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng