नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस, येथील प्रणव प्रताप जाधव यांने जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन २०२३ या परीक्षेमध्ये ९८.७३% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्याच्यावर नातेवाईक, मित्रमंडळी व शाळेतील शिक्षकांचा कौतुकांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नातेपुते येथील डॉ. प्रताप जाधव व डॉ. अर्चना जाधव हे उभय पती-पत्नी डेंटिस्ट आहेत. गेली २४ वर्षांपासून ते नातेपुते येथे कार्यरत आहेत. प्रणव हा त्यांचा मुलगा. प्रणव याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डॉ. बा. ज. दाते प्रशाला, नातेपुते येथे झाले आहे. तर ज्युनिअर कॉलेज चैतन्य अकॅडमी बारामती येथे झाले आहे. प्रणवला इयत्ता दहावी मध्ये ९६% मार्क्स मिळाले होते.
प्रणव प्रताप जाधव याने जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन २०२३ या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल बारामती झटका परिवाराच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा !!!
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng