नातेपुते येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिर येथे रामनवमी उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन व प्रवचनासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात श्रीराम व हनुमान देवस्थान विश्वस्त संस्था यांच्यावतीने सोमवार दि. २७ मार्च ते शुक्रवार दि. ३१ मार्च या दरम्यान रामनवमी तथा श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वै. ह. भ. प. कर्मयोगी रघुनाथशेठ गेनबा उराडे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच वै.ह.भ.प. मनोहर महाराज भगत यांच्या प्रेरणेने व नाना महाराज पांढरे व नाना महाराज तेली तसेच तुकाराम महाराज उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.

नातेपुते गावातील सर्व भजनी मंडळ यांच्या सहकार्याने सोमवार दि. २७ मार्च रोजी सप्ताहाचा शुभारंभ व पुजनाचा कार्यक्रम गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. दैनंदिन कार्यक्रम दुपारी ३ ते ५ भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, रात्री ७ वा. श्रींची नियमाची आरती, रात्री ९ ते ११ किर्तन असा असणार आहे.

सप्ताहातील किर्तन व प्रवचन महोत्सव सोहळा दि. २७ मार्च रोजी प्रवचनसेवा ह.भ.प. कमलाकर काका बडवे, किर्तनसेवा ह.भ‌प. सौ. अश्विनी सुभाष इनामदार, दि. २८ मार्च रोजी प्रवचनसेवा ह.भ.प. कमलाकर काका बडवे, कीर्तनसेवा ह.भ.प. नाना महाराज पांढरे, नातेपुते दि. २९ मार्च रोजी प्रवचनसेवा ह.भ.प. धैर्यशील भाऊ देशमुख, किर्तनसेवा ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुडके, दि. ३० मार्च रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत फुलांचे किर्तनसेवा, ह.भ.प. पांडुरंग महाराज तेली, सायंकाळी प्रवचनसेवा प्रशांत सरूडकर, रात्री कीर्तनसेवा ह.भ.प. भानुदास महाराज दातीर, काष्टी दि. ३१ मार्च रोजी काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प. बाळकृष्ण महाराज नायकोडे मुंबई, यांचे होईल व या कार्यक्रमांची सांगता होईल.

तरी या सर्व कार्यक्रमांस परिसरातील भाविकांनी तन-मन धनाने सहकार्य करून या श्रवण सुखाचा आनंद लुटावा, असे आवाहन श्रीराम व हनुमान देवस्थान विश्वस्त संस्था यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांना गोरडवाडीच्या श्री बिरोबा यात्रेत सन्मानित करण्यात आले….
Next articleशंकरराव मोहिते महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय “ॲडव्हान्सेस इन टिशू कल्चर टेकनिक्स” या विषयावर चर्चासत्र संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here